15 जुलै : मी हिंदू आहे हे बोलणं म्हणजे पाप आहे का? गुन्हा आहे का? असा परखड सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. हे स्पष्ट करताना त्यांनी नरेंद मोदींचं स्वागत केलं. शिवसेनेची सुद्धा हीच भूमिका आहे. नितीशकुमारांनी युती तोडली. त्यांना निधर्मी चेहरा हवा होता.निधर्मी म्हणजे काय?, अशा थोतांड करणार्यांसमोर आम्ही कडवट हिंदू म्हणून उभे राहणारच आणि हीच आमची भूमिका असून शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला हिच शिकवण दिलीय असंही ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं.गुंडाला मारणार्या पोलिसांचं रक्षण करण्यात सरकार अपयशीलखन भैयासारख्या गुंडाला मारणार्या पोलिसांचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरलंय. उलट या पोलिसांना शिक्षा केली जाते अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना अशा बहाद्दर पोलिसांचं रक्षण करेल या पोलीस कर्मचार्यांना कायदेशीर मदत देऊ तसंच त्यांचं कुटुंब उघड्यावर येऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.