12 जुलै : तालिबान्यांशी दोन हात करणार्या मलाला युसुफजाई या 15 वर्षांचा मुलीचा आज वाढदिवस...पाकिस्तानात स्वात खोर्यामध्ये तालिबानचं वर्चस्व आहे. मुलींनी शाळेत जाऊ नये या तालिबानी फतव्याला विरोध करणार्या मलाला युसुफजाई या 15 वर्षांच्या मुलीवर तालिबाननं 9 ऑक्टोबर 2012 या दिवशी गोळीबार केला होता. पण या हल्ल्यातून मलाला आता बचावली आता मलाला आणि तिच्या कुटुंबीयांना इंग्लंडने आसरा दिलाय. ती आता शाळेत जाऊ लागलीये. मलालाचा वाढदिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे मलाला दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्तानं मलाला संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणही करणार आहे. या कार्यक्रमामध्ये 90 देशांमधले विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
मलाला युसूफझई... तालिबान्यांचं वर्चस्व असलेल्या स्वात खोर्यातलं महत्त्वाचं शहर असलेल्या मिंगोराची राहणारी..सामान्य दिसणार्या या असामान्य मुलीनं वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी तालिबानी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. तिनं 2009 साली तालिबान्यांच्या अत्याचाराविषयी लिहिलेली डायरी बीबीसीनं प्रसिद्ध केली आणि या चिमुकल्या रणरागिणीची ओळख जगाला झाली. त्यानंतर तिनं स्वत:चा स्वतंत्र ब्लॉग सुरू केला. चौदा वर्षांची असलेल्या मलालाला तालिबानी बंडखोरांनी गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केला. ती शाळेतून परतत असताना तालिबान्यांनी तिची बस अडवली आणि तिचं नाव घेत बेछूट गोळीबार केला. गोळी मलालाच्या डोक्याला लागून तिच्या खांद्यात गेली. इतर दोन मुलीही जखमी झाल्या. तालिबान्यांनी या हल्ल्याचं समर्थन केलंय.
उपचारासाठी तिला इंग्लंडमधील बर्मिंगहम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. योग्य ते उपचार झाल्यानंतर तिला 4 जानेवारीला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र तिकडे तालिबान्यांनी तिला जीवे मारणाच असा कडक इशारा दिला. पण मलालाने आपली लढाई अर्ध्यावर सोडली नाही. तिने इंग्लंडमध्येच राहुन लढा कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी प्रार्थना करते, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे. फक्त एखादा देशच नाही तर संपुर्ण जगात शांतता कायम राहावी यासाठी मी पुन्हा प्राण देण्यास तयार आहे असं परखड मत मलाला युसूफजाई हिनं व्यक्त केलं. अशा या बहादूर रणरागिणीला आयबीएन लोकमतकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा...