मुंबईत मुसळधार, मध्य रेल्वे विस्कळीत

मुंबईत मुसळधार, मध्य रेल्वे विस्कळीत

  • Share this:

mumbai rain 12 july12 जुलै : मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. आजही सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावलीय. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेचा नेहमीप्रमाणे बोजवारा उडालाय. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत. याचा सर्वात जास्त फटका बसतोय तो कल्याण आणि त्यापुढच्या भागांतून मुंबईकडे येऊ इच्छिणार्‍या प्रवाशांना, कारण कल्याणहून मुंबईकडे यायला पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाहीय. मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली आहे. पाणी तुंबल्यामुळे हिंदमाता परेल, आंबेडकर रोड, दादर किंज सर्कल, गांधी मार्केट, डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, भांडुप पश्चिम इथली वाहतूक विस्कळीत झालीय. पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईत पाणी आणखी तुंबण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 8 ते 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. कांदिवली पूर्व भागात ठाकूर व्हिलेज जवळच्या नाल्यात आठ वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र या दमदार पावसामुळे तुळशी आणि तानसा तलाव पूर्ण भरलाय.

कळवा, मुंब्रा, दिवा स्टेशन पाण्याखाली

ठाण्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. कळवा, मुंब्रा, दिवा स्टेशनदरम्यान पाणी भरलंय. धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे सर्व लोकल जलद मार्गावर वळवल्या आहेत. पाऊस थांबला नाही तर कठीण प्रसंग उभा राहण्याची भीती आहे. जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेचा नेहमीप्रमाणे बोजवारा उडालाय. मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत. कल्याण आणि त्यापुढच्या भागांतून मुंबईकडे येऊ इच्छिणार्‍या प्रवाशांना फटका बसलाय. कारण कल्याणहून मुंबईकडे यायला पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाहीय.

वसई,भाईंदर,मिरारोड आणि नालासोपारात पाणी साचले

मुंबईजवळ वसई तालुक्यात पावसाची दमदार हजेरी आहे. गेल्या 24 तासात 87 मी.मी ची नोंद झालीय. नालासोपारा पालिकेच्या क प्रभाग कार्यालयासमोर पाणी साचले आहे. तुळींज रोड, सेन्ट्रल पार्क,गालानगर,आचोळे रोड, एव्हरशाईन व वसई,भाईंदर,मिरारोड मध्ये सखल भागात पाणी साचले आहे. लोकांची तारांबळ उडाली, तुळींच रोडवरील दुकानात पाणी शिरल्याने दुकानदार त्रस्त झाले. काही सोसाट्यांमध्येही पाणी भरलंय. विरारमध्ये फुलपाडा गोकुळधान मध्ये चाळींची पडझड झाली आहे. वसईतील दहिसर गावात गजानन काशिनाथ धुळे यांचे घर पडले. मदत कार्यासाठी 34 तलाठी, 10 मंडळ अधिकारी याचं पथक तयार केले असल्याचे वसई तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

First published: July 12, 2013, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading