World Cup : विराटचा VIDEO पाहून वाढला सस्पेन्स, प्रतिस्पर्धी संघही टेंशनमध्ये

World Cup : विराटचा VIDEO पाहून वाढला सस्पेन्स, प्रतिस्पर्धी संघही टेंशनमध्ये

या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विराटच्या या व्हिडिओमुळं प्रतिस्पर्धील संघ सध्या टेंशनमध्ये आला आहे.

  • Share this:

लंडन, 02 मे : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होऊन केवळ तीन दिवसच झाले असले तरी, काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. तर, काही संघांनी आपल्याच नावावर लाजीरवाणे विक्रमही लावून घेतले. असे असताना, यंदाच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. दरम्यान याआधी झालेल्या सराव सामन्यात भारतानं न्युझीलंड विरोधात सामना गमावला होता तर, बांगलादेश विरोधात सामना जिंकला होता. त्यामुळं भारतीय संघाचा आत्मविश्वास काहीसा वाढला आहे.

दरम्यान इंग्लंडच्या खेळपट्टींवर फक्त फलंदाज नाही तर, गोलंदाजांनाही चांगली कामगिरी करावी लागते. त्यामुळं भारतीय गोलंदाजांवर चांगली गोलंदाजी करण्याचे दडपण असणार आहे. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांच्यासारखे जलद गोलंदाज आहेत. तर, फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. असे असले तरी, भारतीय गोलंदाजीमध्ये काही त्रुटी आहेत. त्यासाठी आता चक्क विराट कोहलीनं हातात चेंडू घेतला. सरावादरम्यान विराट गोलंदाजी करताना दिसला त्यामुळं विराट कोहली विश्वचषकात गोलंदाजी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीसीसीआयनं जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये विराट बॉलिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. विराटच्या या व्हिडिओमुळं प्रतिस्पर्धील संघ सध्या टेंशनमध्ये आला आहे.

मात्र, सरावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळं भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते. सरावा दरम्यान, टीमचे फिजीओ पैट्रीक फहर्ट विराट कोहलीच्या अंगठ्याला पट्टी बांधताना दिसले. त्यामुळं साऊथ आफ्रिकेविरोधात सामन्याला केवळ 3 दिवस उरले असताना, विराटची ही दुखापच सर्वांचीच धाकधुक वाढली आहे.

बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा नाही

विराट कोहलीच्या या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळं विराट कोहलीच्या या दुखापतीबाबात चाहत्यांना अंदाज बांधता येत नाही आहे. दरम्यान बांगलादेश विरोधात झालेल्या सराव सामन्यात विराटनं 47 धावा केल्या होत्या, त्यामुळं त्याच्या खेळीवर संघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

वाचा-World Cup : असा अनफिट कर्णधार पाहिला नाही...शोएब अख्तरनं घेतली पाकिस्तानच्या खेळाडूंची शाळा

वाचा-World Cup : वॉर्नरचं अर्धशतकासह दमदार कमबॅक मात्र प्रेक्षकांनी मैदानावरच केला अपमान

वाचा-World Cup : महामुकाबल्याआधी चाहत्यांची धाकधूक वाढली, विराट कोहली जखमी

VIDEO: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, टॅक्सीचं भाडं वाढणार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: June 2, 2019, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading