'घड्याळ' आपटलं, काँग्रेसनं खेचली सत्ता

'घड्याळ' आपटलं, काँग्रेसनं खेचली सत्ता

  • Share this:

sangal election08 जुलै : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत सत्तांतर झालंय. राष्ट्रवादीला धूळ चारत काँग्रेसनं सत्ता खेचून घेतलीय. महापालिकेच्या 78 जागांपैकी 76 जागांसाठी काल मतदान झालं. त्यापैकी 40 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीला फक्त 18 जागा मिळवता आल्यात.

भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीला 8 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांना 9 तर जागा मिळाल्यात. मनसेनं एक जागा जिंकत खातं उघडलंय. शिवसेनेची पाटी मात्र कोरीच राहिलीये. या सत्तांतरामुळे काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे.

सत्तेची चाहूल लागली तसा या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आपली ताकदपणाला लावून प्रचार केला होता पण अखेर हाती पराभवच लागला.

Loading...

सांगली महापालिकेचा निकाल

  • एकूण जागा - 78
  • काँग्रेस -40
  • राष्ट्रवादी -18
  • शिवसेना -00
  • मनसे -01
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना -08
  • अपक्ष -09

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2013 02:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...