कोकणात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान

कोकणात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान

  • Share this:

kokan rain04 जुलै : कोकणात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानं शेती आणि घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामधील शेकडो हेक्टर शेती वाहून गेली. ऐन पेरणीच्या वेळीच आलेल्या या पुरामुळे शेतकरी हवालदिल झालाय. चिपळूण संगमेश्वर भागात मोठ्या प्रमाणात रस्ते आणि डोंगर खचल्यानं सार्वजनिक मालमत्तेचंही मोठं नुकसान झालंय. कोसळलेली घरं आणि वाहून गेलेली शेती यांचे पंचनामे सुरु असून कोट्यवधींची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाकडून तातडीची मदत म्हणून 25 लाख रुपये प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहे.

भंडार्‍यात धान पिकाचे नुकसान

तर तिकडे विदर्भातही पावसामुळे नुकसान झालंय. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं भंडारा जिल्ह्यात धान पिकाला फटका बसलाय. त्यामुळे 19 गावामध्ये दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय. धानाची काही दिवसांपूर्वीच लागवण झाल्यानं अती पावसामुळे धानाचे अंकुर जळून गेलेत. शेतात नदी आणि नाल्याचे पाणी भरल्याने धानाचे पर्‍हेही पाण्याखाली गेले आहेत. सरकारने सर्व्हेक्षण करून तातडीन बियाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

First published: July 4, 2013, 1:55 PM IST

ताज्या बातम्या