जमिनीच्या वादातून रक्तरंजित राडा, 9 जणांची गोळ्या झाडून हत्या

जमिनीच्या वादातून रक्तरंजित राडा, 9 जणांची गोळ्या झाडून हत्या

Crime News : जमिनीच्या संघर्षातून रक्तरंजित वाद निर्माण झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. 9 जणांची केली निर्घृण हत्या.

  • Share this:

लखनौ, 17 जुलै : जमिनीच्या संघर्षातून रक्तरंजित राडा निर्माण झाल्याचे वृत्त समोर आलं आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीचा वाद सोडवण्यास प्रशासनाला अपयश आलं. पण यानंतर दोन गटात झालेल्या वादातून 9 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. शिवाय यामध्ये 12 हून अधिक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांत उफाळून आलेल्या वादादरम्यान एका गटानं केलेल्या गोळीबारात दुसऱ्या गटातील कित्येक जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. जमीन विवादाची ही घटना बुधवारी (17 जुलै ) दुपारच्या सुमारास घडली.

(पाहा :VIDEO : रिक्षातून बाहेर खेचून पत्नीने पतीला भररस्त्यावर बेदम धुतले)

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र येथील घोरावल परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.

(पाहा :VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप)

नेमकी काय आहे घटना ?

मूर्तिया ग्राम पंचायतीतील उभ्भा गावात बुधवारी दुपारच्या सुमारास जमीन विवादावरून दोन गटांत संघर्ष उफाळून आला. थोड्या वेळानंतर या संघर्षामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कारण यातील एका गटानं दुसऱ्या गटातील लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 18 लोक गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेमुळे सध्या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांसहीत अन्य पोलीस अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं गोळीबारात जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

(पाहा :भरधाव कारच्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद)

कोणामध्ये होता जमिनीवरून वाद ?

येथील गुर्जर व गोड़ जातीतील काही लोकांमध्ये जमिनीचा वाद सुरू होता. जमिनीचा प्रश्न सोडवण्यास प्रशासनाला अपयश आल्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की यातून भीषण हत्याकांड घडलं. यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

VIDEO : न विचारता बिस्किट खाल्ले म्हणून विद्यार्थ्याला डोकं फुटेपर्यंत मारलं

First published: July 17, 2019, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading