करीरोडवरील एकेरी वाहतुकीचा निर्णय सेनेला सोबत घेऊनच,पोलिसांचं स्पष्टीकरण

करीरोडवरील एकेरी वाहतुकीचा निर्णय सेनेला सोबत घेऊनच,पोलिसांचं स्पष्टीकरण

त्याच वेळी शिवसेनेचं आंदोलन राजकारणाचा भाग आहे असं सांगत शिवसेनेचं आंदोलन गौण ठरवलं.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई, 04 जून : एल्फिन्स्टन आणि करीरोड पुलावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. आज शिवसेनेनं ही एकेरी वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन केलं. मात्र एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवताना शिवसेनेसोबत सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली होती असं स्पष्टीकरण वाहतूक पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार यांनी दिलंय.

त्यामुळे या प्रकरणातील शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुढे आलीय. एकेरी वाहतूकीमुळे इतर मार्गावर परिणाम होत असल्यानं आम्ही तुर्तास हा प्रयोग थांबवत असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलंय. त्याच वेळी शिवसेनेचं आंदोलन राजकारणाचा भाग आहे असं सांगत शिवसेनेचं आंदोलन गौण ठरवलं.

काय म्हणाले अमितेश कुमार?

एल्फिन्स्टन, करीरोड, लोअर परेल या भागात पीक अवर्समध्ये वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीचा विचार करण्यात आला होता.

याबाबत स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक या सगळ्यांशी चर्चा करण्यात आली होती.

प्रायोगिक तत्त्वावर  पंधरा दिवस एकेरी वाहतूक करण्याचा प्रयत्न होता.

मात्र या एकेरी वाहतुकीचा परिणाम इतर मार्गावर होत असल्यानं आम्ही हा निर्णय तूर्तास थांबवलाय, शिवसेनेनं आंदोलन केलं ती वेगळी गोष्ट आहे.  यातून आणखी काय उपाय काढता येईल हे बघू.

First published: June 4, 2018, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading