'मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय हे 3 नेतेच घेणार'

'मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय हे 3 नेतेच घेणार'

'आषाढी एकादशीस उद्धव ठाकरे आणि CM एकत्रित महापूजा करतात का याविषयी माहिती नाही, पण जर ते जात असतील तर चांगलंच आहे.'

  • Share this:

मुंबई 9 जुलै : लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि सेनेच्या युतीचं जमलं आणि त्यांना यशही भरभरून मिळालं. आता विधासभेसाठीही 'युती' भक्कमपणे निवडणूक लढविणार आहे. मात्र सगळ्यांना उत्सुकता आहे ती मुख्यमंत्रीपदाबाबत. कारण सत्तेची वाटणी समसमान होणार असं युती करताना ठरलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न वारंवार विचारला जातोय. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे तीन नेतेच त्याबाबत अंतिम निर्णय घेतील असं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय.

आमच्यासाठी CM म्हणजे कॉमन मॅन असा अर्थ आहे असंही ते म्हणाले. आषाढी एकादशीस उद्धव ठाकरे आणि सीएम एकत्रित महापूजा करतात का याविषयी माहिती नाही, पण जर ते जात असतील तर चांगलंच आहे. युती होणार आहेच, युतीच्या नेत्यांनी एकत्रित विठ्ठलाची पूजा केली तर चांगलेच असंही ते म्हणाले.

कर्नाटकातील राजकीय ड्रामा; विधानसभा अध्यक्षांकडून 14 आमदारांचे राजीनामे नामंजूर

...तर राज ठाकरेंचं नुकसान

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधींच्या घेतलेल्या भेटीवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना सावधान राहण्याचा सल्ला दिलाय. राज ठाकरे हे मनसेसोबत गेले तर त्यांच्याकडे राहिलेले मतदारही त्यांच्याकडून दुरावतील असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.

मनसेने काँग्रेसच राष्ट्रवादीचा प्रचार केला, आधी अप्रत्यक्ष मतं मागितली होती, आता थेट मतं मागतील. मनसे काँग्रेस सोबत गेला तर अजून नुकसान आहे असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसची जनमानसातली प्रतिष्ठा संपली आहे. त्यांची विश्वसनियता राहिली नाही त्यामुळे मनसे काँग्रेससोबत गेली तरीही काहीही फरक पडणार नाही असंही ते म्हणाले.

VIDEO: फेसबुक प्रेम पडलं महागात; ग्रामस्थांनी दहशतवादी समजून दिला चोप

मुंबई काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांची मानसिकता पराभूतांची झाली. राजीनामा द्यायचं कारणच नव्हते, यश अपयश हे चालत राहतं, काँग्रेसला सत्तेची चटक लागली, त्यांना सत्ता विरह सहन करता येत नाही. लोकशाहीसाठी विरोधी पक्ष चांगला असला पाहिजे. काँग्रेस  जिवंत राहीली पाहिजे ही आमची इच्छा आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.

First published: July 9, 2019, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading