राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहापैकी काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या, तर काही नुसत्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, ता. 31 मे : राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहापैकी काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या, तर काही नुसत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत गेले कित्येक वर्ष पोस्टींग असलेले दौर्जे पती पत्नी यांची नाशिक जिल्हयात बदली केली आहे. तर औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी यादव यांना साईड पोस्टिंग देण्यात आलंय.

यशस्वी यादव यांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी आणि महत्त्वाचे व्यक्ती सुरक्षा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. निवडणूक वर्ष लक्षात घेत या बदल्या केल्या गेल्याचे म्हटले जाते.

बदली करण्यात आलेल्या IPS अधिकाऱ्यांची यादी :

- यशस्वी जाधव (पदोन्नती)

सध्याचे ठिकाण पोलिस उप महानिरीक्षक (सक्तीच्या रजेवर)

बदलीचे ठिकाण विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा, मुंबई

- डॉ. सुहास मधुकर वापरके (पदोन्नती)

सध्याचे ठिकाण पोलिस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई

बदलीचे ठिकाण विशेष पोलिस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड

- अश्वती दोर्जे (पदोन्नती)

सध्याचे ठिकाण अपर पोलिस आयुक्त, सशस्त्र पोलिस मुख्यालय, नायगाव, मुंबई

बदलीचे ठिकाण संचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक

- डॉ. छेरिंग दोर्जे (पदोन्नती)

सध्याचे ठिकाण अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मुंबई

बदलीचे ठिकाण विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

- के. एम. मल्लिकार्जून (पदोन्नती)

सध्याचे ठिकाण अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, मुंबई

बदलीचे ठिकाण विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर

- रावसाहेब दत्तात्रय शिंदे (पदोन्नती)

सध्याचे ठिकाण अपर पोलिस आयुक्त (संरक्षण व विशेष सुरक्षा), मुंबई

बदलीचे ठिकाण संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे

- व्ही. के. चौबे (बदली)

सध्याचे ठिकाण विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

बदलीचे ठिकाण सह पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई

- आशुतोष डुंबरे (बदली)

सध्याचे ठिकाण सह पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई

बदलीचे ठिकाण सह पोलिस आयुक्त, गुन्हे, मुंबई

- संतोष रस्तोगी (बदली)

सध्याचे ठिकाण सह आयुक्त, गुप्तवार्ता विभाग, मुंबई

बदलीचे ठिकाण सह पोलिस आयुक्त (प्रशासन), मुंबई

- श्रीकांत के. तरवडे

सध्याचे ठिकाण पोलिस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, म. रा., पुणे

बदलीचे ठिकाण पोलिस उप महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती

 

First published: May 31, 2018, 9:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading