गँगस्टर अबू सालेमवर जेलमध्ये हल्ला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2013 10:32 PM IST

गँगस्टर अबू सालेमवर जेलमध्ये हल्ला

abu salem27 जून : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी गँगस्टर अबू सालेमवर तळोजा जेलमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. देवेंद्र जगताप या कैद्याने सालेमवर गोळीबार केला. यात सालेमच्या हाताला गोळी लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

 

हल्लेखोर जगतापला अटक करण्यात आली आहे. देवेंद्र जगताप हा भरत नेपाळी गँगचा महत्त्वाचा साथीदार असून त्याला जेडी या नावानं ओळखलं जातं. त्याच्यावर 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींचे वकील शाहीद आझमीच्या खूनाचा आरोप आहे. या खटल्यात तो तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

कोण आहे अबू सालेम?

- अबू सालेम मूळचा उत्तर प्रदेशातल्या आझमगढ जिल्ह्यातला आहे.

Loading...

- अबू सालेम हा मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातला महत्त्वाचा आरोपी

- संजय दत्तला हत्यारं पुरवल्याचा त्याचावर आरोप

- अबू सालेम हा मोठा गँगस्टर

- मुंबईत झालेल्या अनेक खून आणि खंडणी प्रकरणात त्याच्यावर आरोप होते.

- नोव्हेंबर 2005 साली त्याला पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आलं.

- अबू सालेम गँगनं 1995 ते 2000 या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात खंडणी सत्र सुरू केलं होतं.

- त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक लोकांना या गँगनं धमक्याही दिल्या होत्या.

- बिल्डर प्रदीप जैन हत्याप्रकरण आणि मनिषा कोईरालाचे सेक्रेटरी अजित देवानी यांच्या हत्येचाही त्याच्यावर आरोप आहे.

- अबू सालेम पूर्वी दाऊद इब्राहीम गँगचा महत्त्वाचा गुंड होता.

कोण आहे देवेंद्र जगताप?

- जेडी नावानं कुप्रसिद्ध

- भरत नेपाळी गँगचा महत्त्वाचा सदस्य

- शाहीद आझमीच्या खून खटल्यातील आरोपी

- शाहीद 93 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचा वकील

- फैझल शेख याच्यावरही हल्ल्याची योजना केली होती

- फैझल बॉम्बस्फोट खटल्यातला आरोपी

- सेशन कोर्टातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2013 10:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...