IND vs NZ : भारताची सेमीफायनल 11 नव्हे तर 'या' एका खेळाडूविरुद्ध!

IND vs NZ : भारताची सेमीफायनल 11 नव्हे तर 'या' एका खेळाडूविरुद्ध!

न्यूझीलंडचा संघ हा कर्णधार केन विल्यम्सनवर अवलंबून असल्यामुळं भारताला त्याला बाद करावे लागणार आहे.

  • Share this:

मॅंचेस्टर, 09 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये आज सेमीफायनलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कारण या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो फायनलमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरणार आहे. दरम्यान भारत-न्यूझीलंड या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भिडत आहेत. साखळी स्पर्धेतील सामना पावसामुळं रद्द झाला होता. त्यामुळं हे दोन्ही संघ आज पहिल्यांदाच आमने-सामने आले आहेत.

दरम्यान दोन्ही संघांबाबत बोलायचे झाल्यास, भारताचे फलंदाज आणि गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ केवळ एका खेळाडूवर अवलंबुन आहे. जर भारताला फायनलमध्ये पोहचायचे असेल तर, त्यांना केवळ एका खेळाडूला लवकर बाद करावे लागणार आहे. तो खेळाडू आहे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन. न्यूझीलंडकडे रॉस टेलर, मार्टिन गुपतील आणि टॉम लाथम यांसारखे अनुभवी फलंदाज आहेत. मात्र वर्ल्ड कपमध्ये या तिन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. विल्यम्सननं या वर्ल्ड कपमध्ये 30.28च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा वन मॅन आर्मी आहे केन

कर्णधार केन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या 15मध्ये असणार एकटा खेळाडू आहे. न्यूझीलंडनं पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्याविरोधात सलग सामने गमावले आहेत. त्यामुळं न्यूझीलंडसाठी ही बाब चिंतेची असणार. त्यांचा एकही फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही.

वाचा- World Cup: कोण जिंकणार? भारत, न्यूझीलंड की पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज!

केनला बाद करण्यासाठी जडेजा महत्त्वाचा

गेल्या पाच वर्षात केनला लेफ्ट आर्म स्पिनरनं बाद केले आहे. भारताचा स्पिनर प्रज्ञान ओझानं केनला पाच वेळा बाद केले आहे. तसेच, युवराज सिंगनेही केनला चांगलेच हैराण केले होते. त्यामुळं रविंद्र जडेजा भारतासाठी महत्त्वाची भुमिका बजावू शकतो.

वाचा- World Cup सेमीफायनलसाठी भारताला मिळाला अलर्ट; घ्यावी लागणार 'ही' काळजी!

धिम्या गोलंदाजांची भारताला गरज

न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी भारताला धिम्या फलंदाजांची गरज असणार आहे. यासाठी बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

असा असेल भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.

वाचा- World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा !

भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा

First published: July 9, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading