S M L

वीजमीटर्स ठेवले जमिनीत पुरून

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2013 02:39 PM IST

वीजमीटर्स ठेवले जमिनीत पुरून

 khed story27 जून : महावितरणच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक नमुना उघड झालाय. रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यातल्या दोन गावात जमिनीमध्ये पुरून ठेवलेले महावितरणचे तब्बल 80 हून अधिक वीजमीटर्स आढळून आलेत. खेडजवळ मुंबई गोवा महामार्गावर काशीमठ भागात राजाराम उद्योग समुहाच्या इमारतीच्या मागच्या भागात हे वीजमीटर्स भुशामध्ये लपवून ठेवण्यात आले होते.

तसंच खेडमधल्या खवटी गावातल्या एका हॉटेलच्या मागच्या बाजूलाही असे मीटर्स दडवून ठेवण्यात आले असल्याचं उघडकीला आलंय. कायद्यानुसार मीटर बदलल्यानंतर ग्राहक क्रमांकासहीत तो महावितरणमध्ये जमा करण्याची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांची असते.

तरी हे मीटर खाजगी जागेत असे का दडवून ठेवण्यात आले आणि ते कोणी दडवले याची चौकशी करण्याची मागणी आता लोक करत आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांच्या संगनमतानंच हा प्रकार केला गेला असल्याचं म्हटलं जातंय. इतर गावांतही अशा प्रकारे मीटर्सचा साठा केला गेला असल्याचं आयबीएन लोकमतच्या सूत्रांकडून समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2013 02:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close