तिहेरी हत्याकांडानं अकोला हादरलं, जावयाने सासू-सासऱ्यासह मेव्हण्याची केली हत्या

तिहेरी हत्याकांडानं अकोला हादरलं, जावयाने सासू-सासऱ्यासह मेव्हण्याची केली हत्या

"अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी बाळापुरात येऊन वाद घालत होता. हाच राग अनावर होत आरोपी जावयाने सासू-सासरा आणि मेव्हण्याला ठार मारले"

  • Share this:

अकोला, 17 मे : कौटुंबिक वादातून तिघांचा खून करण्यात आल्याची घटना अकोल्यातील बाळापूर शहरात उशिरा रात्री घडली आहे. अनेक दिवसांपासून आरोपीची पत्नी सासरी राहत नसल्याच्या कारणावरून बायको, सासू व मेव्हण्याचा खून केला आहे.

बाळापूर शहरातील आबादनगरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने तिघांवर वार करण्यात आला. यामध्ये एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेहबूब खान, शबाना मेहबूब खान आणि फिरोज मेहबूब खान अशी मृतकांची नावे आहेत. आरोपी फिरोज रज्जाक याला पोलिसांनी अटक केलीय. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे.

असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर आणि पोलिसांचा प्रचंड ताफा बाळापुरात दाखल झाला. यामध्ये सहभागी असलेला आरोपी फरार होऊन बार्शी टाकळी येथे लपून बसल्याची माहिती मिळताच बार्शी टाकळी पोलिसांनी आरोपीला अटककरून बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी सै.फिरोज से रज्जाक हा बार्शी टाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहीवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते.

अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी बाळापुरात येऊन वाद घालत होता. हाच राग अनावर होत आरोपी जावयाने सासू-सासरा आणि मेव्हण्याला ठार मारले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. मात्र यामागे आणखी काही कारण आहे का याचा  पोलीस तपास करीत आहेत.

First published: May 17, 2018, 4:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading