S M L

'चर्चा थांबवा अन्यथा मलाही बोलावे लागेल'

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2013 05:23 PM IST

'चर्चा थांबवा अन्यथा मलाही बोलावे लागेल'

raj on yutiनाशिक 24 जून : महायुतीबाबत मनसेच्या वतीने दुसर्‍यांनी बोलण्याची गरज नाही आणि इतर पक्षांनीही बोलण्याची गरज नाही मी हे सगळं थांबवयाचं सांगितलंय नाहीतर जे कांही बोलणं झालं ते मी उघड करेन असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांना दिला. राज ठाकरे आज नाशिक दौर्‍यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकबाबत नवी ध्येयधोरण स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आणि राजकीय हालचालींना वेग आलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना आणि मनसे एकत्र यावं यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून आटोकात प्रयत्न सुरू आहे. मात्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वेळा 'टाळी' न देण्यास नकार दिला. आता मात्र राज यांनी युतीच्या नेत्यांना थेट इशारा दिलाय.

या सर्व गोष्टींचा निर्णय पक्षप्रमुख म्हणून मी करतो. त्यामुळे बाकी लोकांनी याबाबत चर्चा करण्याची गरज नाही. इतर पक्षांनी आणि मीडियानेही चर्चा करण्याची गरज नाही मी नेहमी पाहतो वृत्तपत्रात बातम्या वाचतो तर मला यावरून काही पत्रकारच उताविळे झाल्याचं दिसतंय. यासंदर्भातील माझ्या पक्षाबाबत कुठल्याही विषयी बोलणं, मी ज्या गोष्टी थांबवण्यास सांगितलंय. आणि आता जर याबाबत कुठल्याही पक्षाकडून चर्चा झाली तर माझ्यासोबत जी चर्चा झाली आहे ती मला उघड करावी लागेल असा थेट इशारा राज यांनी युतीच्या नेत्यांना दिलाय.

'अनधिकृत बांधकाम पाडा'

नाशिक महापालिकेच्या बेलगाम कारभाराची सूत्र आता राज ठाकरे यांनी हातात घेतली आहेत. नाशिक शहरातील अनाधिकृत बांधकामं पाडण्याला मनसेचा कायम पाठिंबा राहील. जर माझ्या पक्षाचे लोक आड आले तरी ऐकायच नाही तुम्ही बिनधास्त हातोडा चालवा अशी सुचना राज यांनी पालिका आयुक्तांनी केली. पालिकेच्या कामाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी दर 15 दिवसांनी नाशिकचा दौरा करणार असा सांगितलंय. तसंच मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे पक्षाचं काम कमी, जातीचं राजकारण करतात अशी टीकाच आपल्याच नगरसेवकावर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2013 03:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close