ठाणे-बेलापूर रस्ता वादाच्या भोवर्‍यात

ठाणे-बेलापूर रस्ता वादाच्या भोवर्‍यात

15 जानेवारी, मुंबईविनय म्हात्रेनवी मुंबईतला ठाणे बेलापूर रोड पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधणीमुळे गेल्या तीन वर्षांपासून काम पूर्ण न करणार्‌या कंत्राटदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी होत आहे. पण उलट त्याच ठेकेदाराला आणखी बावन्न कोटींचं कंत्राट देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला आहे.ठाणे-बेलापूर रस्त्याच्या एकशे अकरा कोटींच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरवात झाली होती. तेरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर तब्बल 172 ठिकाणी तडे गेलेत. अशातच 42 कोटींच्या पुलाचं काम याच कंत्राटदाराला देण्यात आलंय. पालिका एवढ्यावर थांबली नाही, याच ठेकेदाराला वाढीव कामासाठी 52 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे.एकशे अकरा कोटींचा हा प्रोजेक्ट आता दोनशे पाच कोटींवर गेलाय. पेव्हर ब्लॉक, जलवाहिन्या स्थलांतरीत करणे यासारख्या कामांमुळे खर्च वाढला. त्यामुळे ही रक्कम वाढवल्याचं प्रस्तावात म्हटलं आहे.शिवसेनेनं या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला आहे. "पहिलं काम खराब केलं म्हणून या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टला टाकण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र त्याचा विरोध न करताचा दुसरं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं गेलंय. म्हणून या प्रस्तावाला विरोध करण्याची आमची भूमिका आहे" असं शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी सांगितलं.कंत्राटदारावर नवी मुंबई पालिका मेहरबान झालीय. आणि विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. मात्र या सगळ्यात भरडली जाणार आहे ती सामान्य जनताच.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2009 09:25 AM IST

ताज्या बातम्या