पुण्यातील 55 यात्रेकरू सुखरूप परतले

पुण्यातील 55 यात्रेकरू सुखरूप परतले

  • Share this:

pune atrekaruपुणे 22 जून : उत्तराखंडाच्या प्रलयामधून वाचलेले यात्रेकरू आता आपल्या गावी परतायला सुरवात झाली आहे. पुण्यातील 55 यात्रेकरूंचा एक गट संध्याकाळी पुणे स्टेशनावर पोहोचला. हजरत निजामुद्दीन -गोवा रेल्वेनं ते परत आले तेव्हा त्यांचं स्वागत गुलाबाची फुलं- पेढे देऊन करण्यात आलं. दोन चार दिवस मिळेल तिथं आसरा घेऊन आणि मिळेल ते खाऊन या यात्रेकरूंनी संकटाचा सामना केला.

तर औरंगाबादेतील आज 19 जणांचा एक गट परत आलाय. महाप्रलयातून बचावलेल्या भाविकांचं मनसेतर्फे रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं. औरंगाबादेतील कुलकर्णी कुटूंबातील दोन जण आणि कुंटे कुटूंबातील 7 जणांचा यामध्ये समावेश आहे. या सर्वांच्या चेहर्‍यावर कुटूंबाला भेटल्याचा आनंद दिसत होता मात्र अजूनही डोळ्यातून महाप्रलयाची भयानकता जाणवत होती.

First published: June 22, 2013, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading