'मी-तूपण गेले वायां, पाहता पंढरीच्या राया'; आषाढीसाठी 10 लाख भाविक विठूच्या नगरीत

'मी-तूपण गेले वायां, पाहता पंढरीच्या राया'; आषाढीसाठी 10 लाख भाविक विठूच्या नगरीत

पायी चालत दिंडीमधून येणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातं.

  • Share this:

पंढरपूर, 12 जुलै : 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' असं म्हणत अवघी पंढरी विठुमय झाली आहे. राज्यभरातून लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरीला दाखल झालेत. आषाढीच्या निमित्तानं अवघी पंढरी नगरीमध्ये वारकऱ्यांची मांदायाळी पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली.

पायी चालत दिंडीमधून येणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी आहे. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतलं जातं. या अनुभुतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून उन-वारा पावसाची तमा न करता सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने चालत असतात. 'तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा' अशी पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ सगळ्या भक्तांना लागलेली असते. तेच वारकारी आणि भक्त आज सावळ्या विठुरायाच्या दर्शनानं तृप्त झाले आहेत.

आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा लातुरच्या विरकरी दाम्पत्याला मिळाला. विठ्ठल मारुती चव्हाण आणि त्यांची पत्नी मानाचे वारकरी ठरलेत. विठ्ठल चव्हाण हे सांगवीच्या सुनेगाव तांडा इथले रहिवासी आहेत. ते 61 वर्षांचे आहेत. 1980 सालापासून ते पंढरीची वारी करत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, मुंबईतल्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरातही आषाढी एकादशीचा सोहळा पार पडतो आहे. मुंबईकरांनी पहाटेपासूनच विठ्ठलाच्या दर्शनाला गर्दी केली आहे. जे पंढरपुरला जाऊ शकत नाहीत ते भाविक आवर्जुन वड्याळ्याच्या विठ्ठल मंदिरात जात असतात. त्यामुळे आज प्रत्येक भाविक अभंगात न्ह्याला असं म्हणायला हरकत नाही.

तब्बल 10 लाख वारकरी पंढरीत दाखल...

गेल्या अठ्ठावीस युगांपासून कटेवर हात ठेऊन आपल्या भक्तांची वाट पाहत असलेल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी तब्बल 10 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. दरम्यान, गुरुवारी 50 हजारांपेक्षा जास्त वारकरी हे रांगेत दर्शनासाठी उभे होते. 65 एकर परिसरात 3 लाख 50 हजार मठ, मंदिर, धर्मशाळा या ठिकाणी आहे. पंढरीत दाखल झालेल्या भाविकांची पाऊलं आपोआपच चंद्रभागेकडे वळतात. त्यात पाऊस झाल्यामुळे नदीपात्रात पाणी भरपूर आहे. त्यामुळे अगदी वैष्णवांदा मेळावा पंढरीत आज पाहायला मिळतो.

VIDEO: भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी

First published: July 12, 2019, 8:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या