देव सुरक्षित पण...

देव सुरक्षित पण...

  • Share this:

kedarnath manderउत्तराखंड 21 जून : केदारनाथ हे मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. पण, गंगेनं रौद्र रूप धारण केलं आणि हा संपूर्ण परिसर उद्धवस्थ झाला. पूराचा मोठा फटका केदारनाथला बसला होता आणि त्या ठिकाणी आयबीएन नेटवर्कची टीम पोहोचलीयं. सीएनएन आयबीएनच्या सीनिअर एडिटर अनुभा भोसले यांनी केदारनाथला जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. मंदिराचा बाहेरचा भाग पुराच्या पाण्याखाली गेला असताना आतल्या भागात मात्र पाणी पोहोचलं नव्हतं. मात्र आत असलेल्या काही लोकांचा मृत्यू मात्र झाला होता. यात्रेकरूंचं सामान, रग्स, चटया यांना काहीही झालं नाही. मंदिरातल्या मूतीर्ंनासुद्धा काही झालं नाही. पण, मंदिरामध्ये पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ आणि चिखल सगळीकडे साचलाय.

यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं शहर, मंदिरांचं शहर म्हणून जे ओळखलं जात त्या केदारनाथ.. इथं ज्यांना इथून बाहेर पडायचयं अशा अनेक लोकांची गर्दी इथं जमा झाली आहे. आणि यातले बरेचसे लोक स्थानिक आहेत. या सगळ्यांना पूराचा मोठा फटका बसलाय आणि त्यांनी मिळेत त्या ठिकाणी आसरा घेतला आहे. त्यांना प्रतिक्षा आहे की, त्यांना सुरक्षित जागी नेलं जाण्याची. त्यांना जरा खालच्या भागांमध्ये आसरा घ्यायचाय. त्यांना गुप्तकाशीला पोहोचायचंय. या पैकी फारच कमी जणं हे पर्यटक आहेत.

 

वरच्या भागात अडकलेल्या काही पर्यटकांना पायी खाली आणल्या जाणार आहेत. हा सात किलोमिटरचा अवघड पट्टा आहे. त्यानंतर त्यांना सुरक्षित जागी नेलं जाणार आहे. भारतीय हवाईदलाच्या मते त्यांना हे सगळ्यांना इथून घेईन जाण्यासाठी किमान 15-20 विमानं हवी आहेत. पण इथं असलेल्या लोकांना खूपच त्रास सहन करावा लागलाय. त्यांना इथं थंडीत राहवं लागतं. आजूबाजूला सगळीकडे फूड पॅकेट्स पडली आहेत. इथं असलेला एकमेव असा भाग आहे की जिथे इतक्या वेळ इथे थांबू शकले आहेत.इथं लोकांना ने आणण्यासाठी जी काही विमानं आहेत त्यांच्यासाठी वापरली जाणारी विमानं छोटी आहेत. त्यामुळे लोकांना नेण्यासाठी उशीर होतोय.

लोकांनी इथं त्रासात अनेक रात्री काढल्या आहेत. बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला थोडा वेळ लागेल. मात्र आपण पुन्हा हे सांगायला पाहिजे की लोकांनी इथं थंडीत रात्री घालवल्या आहेत. या भागात पहिल्यांदाच मीडिया पोहोचला आहे. ही माहिती म्हणजे या प्रलयात त्रास सहन करत असलेल्या फार कमी लोकांची माहिती आहे. हवाईदल लोकांना इथं नेण्याचा प्रयत्न करतंय. मात्र लोकांचा संयम आता सुटत चाललाय. मात्र हवाईदल प्रयत्नांची शर्थ हे नक्की.

बद्रीनाथमध्ये 5 हजार लोकं अडकली ?

केदारनाथमधून सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर लष्करासमोर मोठं आव्हान असणार आहे ते बद्रीनाथचं... बद्रीनाथमध्ये जवळपास 5 हजार लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त होतेय. दोन्ही ठिकाणचं बचावकार्य पूर्ण करायला लष्कराला आणखी पाच ते सहा दिवस लागणार आहे. बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा 28 किलोमीटरचा रस्ता पुरात पूर्ण वाहून गेलाय. पण, या भागात सध्या फक्त 4 हेलिकॉप्टर बचावकार्य करत आहेत.

 

लष्कराचे जवान रामबारापर्यंत पोचलेत. इथून ते हेमकुंडपर्यंत जाणार आहेत. हेमकुंड साहिबमध्ये अजूनही बाराशे लोक अडकले आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. गौरीकुंड भागात पाण्याच्या जबरदस्त प्रवाहात शेकडो लोक वाहून गेलेत. गौरीकुंडमध्ये सुरू असलेलं बचावकार्य आपण पाहू शकतो. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस आणि लष्कराचे जवान लोकांना दोरीच्या पुलाच्या साहाय्यानं बाहेर काढताहेत. शकडो लोकांची सुखरूप सुटका करण्यात आलीय.

हरिद्वारमधून आज 48 मृतदेह काढण्यात आलेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात या लोकांचा मृत्यू झाला. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम आता सुरू आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरातल्या मृतांचा सरकारी आकडा आता 556 पर्यंत पोचलाय.

First published: June 21, 2013, 10:24 PM IST

ताज्या बातम्या