लंकेचा वाजला डंका,भारताची फायनलमध्ये धडक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2013 11:15 PM IST

लंकेचा वाजला डंका,भारताची फायनलमध्ये धडक

india vs lanka20 जून : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयाची मालिका कायम राखत भारतीय टीमने स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा 8 विकेट आणि 15 ओव्हर्स राखून दणदणीत पराभव केला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारतीय टीमनं मॅचवर वर्चस्व गाजवलं.

भारताच्या भेदक बॉलिंगसमोर पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत केवळ 181 रन्स करता आले. अँजेलो मॅथ्यूजचा अपवाद वगळता लंकेच्या एकाही बॅट्समनला रन्सचा वेग वाढवता आला नाही. विजयाचं हे माफक आव्हान भारतानं अवघ्या 2 विकेटच्या मोबदल्यात 35व्या ओव्हर्समध्येच पार केलं. शिखर धवन आणि विराट कोहलीनं शानदार हाफसेंच्युरी ठोकत भारताला फायनलचे दरवाजे उघडून दिले.

शिखर ध'वन'हिरो

भारताच्या या दणदणीत विजयाचा हिरो ठरला तो पुन्हा एकदा डावखुरा बॅट्समन शिखर धवन...कार्डिफच्या ज्या पीचवर भारतीय बॉलिंगसमोर लंकेची अनुभवी बॅटिंग गडगडली त्याच मैदानावर युवा शिखर धवननं दमदार बॅटिंग करत भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहित शर्माबरोबर त्याने ओपनिंगला 77 रन्सची दमदार पार्टनरशिप केली. रोहित शर्मा 33 रन्सवर आऊट झाला, पण धवननं मैदानावर तळ ठोकला, स्पर्धेत सलग दोन सेंच्युरी करणार्‍या धवननं या मॅचमध्येही शानदार हाफसेंच्युरी ठोकली.

92 बॉलमध्ये धवननं 6 फोर आणि 1 सिक्स मारत 68 रन्स केले. या मॅचमधला हा सर्वाधिक स्कोर ठरलाय. या संपूर्ण स्पर्धेत शिखर धवनच्या नावावर सर्वाधिक 332 रन्स जमा आहेत यात 2 सेंच्युरी आणि एका हाफसेंच्युरीचा समावेश आहे. सेहवाग आणि गंभीरसारख्या दिग्गज खेळांडूच्या बदली मिळालेल्या या संधीचं शिखर धवननं सोनं केलंय. आणि त्याच्या रुपानं भारताला दमदार ओपनिंग बॅट्समनचा पर्यायही मिळाला. टेस्ट पदार्पणात सेंच्युरी ठोकत अवघ्या जगाला आपल्या दिमाखदार एंट्रीची दखल घ्यायला त्यानं भाग पाडणार्‍या धवननं आता वन डे क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला.

Loading...

भुवनेश्‍वर कुमारची दमदार बॉलिंग

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारताच्या युवा बॉलर्सनं सेमीफायनलमध्येही दमदार बॉलिंग केलीय. युवा भुवनेश्‍वर कुमारनं पुन्हा एकदा भारताला ब्रेक थ्रु मिळवून दिला. तर अनुभवी ईशांत शर्मा आणि आर अश्विननं प्रत्येकी 3 विकेट घेत लंकेला बॅकफूटवर ढकललं.

धोणी बनला बॉलर

भारतीय बॉलर्स दमदार कामगिरी करतायत, 3 फास्ट आणि 2 स्पीन बॉलर्सनं लंकेच्या स्कोरला लगाम घातला. त्यातच आज आणखी एका बॉलरनं आपल्या बॉलिंगची चुणूक दाखवली. हा सहावा बॉलर होता, स्वता कॅप्टन महेंद्रसिंग धोणी.. धोणीलाही आज बॉलिंग करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यानं विकेट किपिंगची सूत्र दिनेश कार्तिककडे सोपवली आणि बॉलिंग केली. धोणीनं तब्बल 4 ओव्हर्स टाकल्या आणि यात त्यानं केवळ 17 रन्स दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2013 10:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...