आदर्श घोटाळा:मोडक यांनी लपवली माहिती

आदर्श घोटाळा:मोडक यांनी लपवली माहिती

  • Share this:

abhin modakमुंबई 20 जून : आदर्श सोसायटी घोटाळ्याचा तपास करण्यार्‍या सीबीआय अधिकार्‍यांची पोलखोल केल्यानंतर आणखी एक धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे सीबीआयचे अधिकारी अभिन मोडक यांनी फ्लॅटची माहितीच लपवल्याच आता समोरं आलं आहे. तामिळनाडू पोलिसांच्या वेबसाईटवर मोडकांच्या फ्लॅटचा उल्लेखच नाही.

 

कादंबरी सोसायटीमधल्या वादग्रस्त फ्लॅट धारकांची संपूर्ण यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. या यादीत राजकारणी, अधिकार्‍यांच्या नातेवाइकांनी वशिलेबाजीने अनेक फ्लॅट धारकांनी पदाचा गैरवापर करत फ्लॅट्स मिळवले आहे. विशेष म्हणजे सोसायटीचे प्रमोटर आणि माजी इन्कम टॅक्स कमिशनर ओंकार गणवीर यांना 2009 मध्ये 50 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी सीबीआयनंच अटक केली होती.

आदर्श घोटाळ्याचे मुख्य तपास अधिकारी अभिन मोडक हे मूळचे तामिळनाडू केडरचे आहेत. तामिळनाडू पोलिसांच्या वेबसाईटवर सर्व आयपीएस अधिकार्‍यांना मालमत्तेचा तपशील जाहीर करावा लागतो. 11 जानेवारी 2011 ला अभिन मोडक यांनी या वेबसाईटवर आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केलाय. त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीमध्ये 40 लाख रुपयांची 3 एकर शेती आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीमध्ये 30 लाख रुपयांची शेती तसंच नागपूरमधल्या प्रगतीशील कॉलनीमध्ये 1 कोटी रुपयांचं वडिलोपार्जित घर दाखवलंय. पण, जुलै 2010मध्ये कांदबरी सोसायटीमध्ये फ्लॅटसाठी भरलेल्या पैशांचा हिशोब दिलेला नाही. भूखंडाची 1 कोटी 82 लाख रुपयांची रक्कम भरल्यानंतर 15 जुलै 2010ला कांदबरी सोसायटीच्या सदस्यांची यादी प्रसिद्ध झाली. त्यामध्ये अभिन मोडक यांचंही नाव आहे.

कादंबरीत कसे मिळाले फ्लॅट्स

1. अभीन मोडक

पद - सीबीआयचे डीआयजी

काम - आदर्श घोटाळ्याची चौकशी केली

मूळ केडर - तामिळनाडू

2. राजेश मोडक

पद - पोलीस अधीक्षक

नातं - अभीन मोडक यांचा धाकटा भाऊ

मूळ केडर - उत्तर प्रदेश

3. राजकुमार व्हटकर

पद - सीबीआयचे डीआयजी

काम - आदर्शमधल्या फ्लॅटच्या अफरातफरीची चौकशी

- क्राईम ब्रँचमध्ये असताना आदर्शच्या गहाळ फायलींचा तपास केला

4. ओंकार गणवीर

पद - माजी इन्कम टॅक्स कमिशनर

- 50 लाखाची लाच घेताना सीबीआयकडून अटक

5. अभिषेक ओंकार गणवीर

काम - खाजगी नोकरी

नातं - ओंकार गणवीर यांचा मुलगा

6. प्रदीप प्रतापराव वळसे-पाटील

नातं - दिलीप वळसे-पाटील यांचे नातेवाईक

7. पद्माकर गायकवाड

पद - मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी

- पदावर असताना फ्लॅट मिळवला

8. मनोज गोहाड

पद - मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी

- पदावर असताना फ्लॅट मिळवला

9. रवींद्र जे डांगे

नातं - माजी मुख्य सचिव जे पी डांगे यांचा मुलगा

10. रजय मोहन रमेश कुमार

नातं- महसूल विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार यांचा मुलगा

11. दीक्षा नितीन राऊत

- महाविद्यालयीन विद्यार्थिनी

नातं - रोहयो मंत्री नितीन राऊत यांची मुलगी

12. दीपक राऊत

- व्यवसायाने डॉक्टर

नातं - रोहयो मंत्री नितीन राऊत यांचा धाकटा भाऊ

13. विजय रामचंद्र खर्चे

- माजी पणन संचालक राम खर्चे यांचा मुलगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2013 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading