S M L

पावसाचा तडाखा, केळीबागा उद्धवस्त

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2013 07:31 PM IST

पावसाचा तडाखा, केळीबागा उद्धवस्त

NANDED RAIN_4नांदेड 20 जून : वादळी वार्‍यासह आलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक हजार हेक्टरवरील केळीबागा उद्‌ध्वस्त झाल्या. पावसाच्या तडाख्यामुळे हातातोंडाशी आलेलं केळीचं संपूर्ण पीक आडवं झालं.

कोट्यवधी रूपयांच्या केळी बागा उद्धवस्त होऊनही पंचनामा करण्यासाठी शासनाचा कुणीही प्रतिनिधी न फिरकल्याने संतप्त शेतकर्‍यांनी नागपूर - नांदेड महामार्गावर रास्ता रोको केला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी हेक्टरी 75 हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती.

पण शासनाने या मागणी संदर्भात कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे हे शेतकरी अखेरीस रस्त्यावर उतरले. दोन तास रास्ता रोको केला. शासनाने जर या प्रकरणात लक्ष घातलं नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा या शेतकर्‍यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2013 07:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close