मुंबई, 10 जुलै : अभिनेता हृतिक रोशनचा आगामी सिनेमा ‘सुपर 30’ मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. हा सिनेमा गणित तज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचं ‘U’ सर्टिफिकेट देत हिरवा कंदिल दाखवला असला तरीही या सिनेमात त्यांनी काही बदलही सुचवले आहेत. रिलीजसाठी अवघे दोन दिवस उरले असताना सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या काही बदलांमुळे आता हा सिनेमा अडचणीत सापडला आहे. या सिनेमातील काही संवादांवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डानं ते संवाद काढून टाकण्यास सांगितलं आहे.
सेन्सॉर बोर्डानं ‘सुपर 30’च्या निर्मात्यांना या सिनेमातील रामायणाचा उल्लेख करण्यात आलेला एक संवाद काढून टाकण्यास सांगितले. सेन्सॉर बोर्डाच्या सुचनांशी निगडीत सर्व माहिती त्यांच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यानुसार एका संवादात रामायण या शब्दाला राज पुरम हा शब्द वापरला असल्याचं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे हा संवाद काढून टाकण्यास सांगण्यात आलं आहे. तसेच सिनेमातील एका सीनमध्येही काही बदल करण्यास सांगितले गेले आहेत. एका सीनमध्ये एक मंत्री बार डान्सरला पोटाला स्पर्श करताना दाखवण्यात आला आहे ज्यावर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला आहे. याशिवाय या सिनेमातील गाण्यामध्ये अँटी लिकर डिसक्लेमर दाखवण्याची सूचना सेन्सॉर बोर्डानं दिली आहे.
पत्रकाराशी पंगा घेणं कंगनाला पडणार भारी, मीडियानं घेतला ‘हा’ निर्णय
हृतिक सध्या 'सुपर 30'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात बिहारचे गणित शिक्षक आनंद कुमार यांचा प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. या सिनेमात हृतिकने गणित शिकवणारे शिक्षक आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ते दरवर्षी गरीब घरातील पण अभ्यासात हुशार अशा ३० मुलांची निवड करतात आणि त्यांना आयआयटीचं ट्रेनिंग देतात. येत्या 12 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
भारत- न्युझीलंड सामन्यादरम्यान हा खेळाडू फिरतोय क्रोएशिया आणि इटलीत
सुपर 30' मध्ये हृतिकसोबत टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूरही दिसणार आहे. मृणालनं या आधी काही मराठी सिनेमात आणि ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे. 'सुपर 30' हा मृणालचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमामध्ये पंकज त्रिपाठी, नंदिश सिंह सिंधू, विरेंद्र सक्सेना आणि अमित साध या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
VIDEO : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली 'ही' निरागस गायिका आहे तरी कोण?
===========================================================================
SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?