IBN लोकमत इम्पॅक्ट:धान सडवणार्‍या अधिकार्‍यांवर होणार कारवाई

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2013 10:36 PM IST

GONDIA PADDY DECAYगोंदिया 18 जून : इथं जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात तब्बल 2 लाख 30 हजार क्विंटल धान सडतं असल्याची बातमी सोमवारी आयबीएन-लोकमतने दाखवली होती. याची गंभीर दखल घेत आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी येत्या दोन दिवसात कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

 

जबाबदारी निश्चित करुन संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं पिचड यांनी सांगितलं. राईस मिल असोसिएशन आणि सरकारमधल्या मतभेदामुळे हे धान सडतंय. राईस मिल असोसिएशनने धानाची भरडाई करण्यास नकार दिलाय. वाहतूक खर्च वाढवून द्या आणि मागील पाच वर्षांचे एकूण 25 कोटी रूपये द्या, नाहीतर हे धान उचलणार नाही अशी भूमिका राईस मिल असोसिएशनने घेतलीय.

 

पण पावसात भिजल्यामुळे हे धान आता भरडाईच्या लायकीचं राहिलेलंच नाही. वाया गेलेल्या या धानाची किंमत 55 कोटी रुपये आहे. गेल्या तीन पावसाळ्यांपासून आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेलं धान जागेअभावी असंच सडतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2013 10:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...