गर्भलिंगनिदान प्रकरणी शाहरुखची होणार चौकशी

गर्भलिंगनिदान प्रकरणी शाहरुखची होणार चौकशी

  • Share this:

srkमुंबई 17 जून :  बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने गर्भलिंगनिदान चाचणी केली आहे का ? जर केली असेल तरी ती कुठे केली ?, सरोगसी कायदेशीर आहे का ? याची चौकशी करावी असे आदेश आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले आहे.

 

सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी शाहरुख विरोधात महापालिकेकडे तक्रार केली होती. शाहरूखनं PCPNDT कायद्याचा भंग केल्याचा आरोप ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी केला होता.

 

'मिड डे' दैनिकात शाहरुख खानला सरोगसीच्या माध्यमातून मुलगा होणार असल्याची बातमी डॉक्टरांचा हवाला देऊन छापण्यात आली. मात्र PCPNDT कायद्याअंतर्गत प्रसुती पुर्वलिंग निदान करण्यास कायद्यानं मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे डॉक्टरांनी ही माहिती कशाच्या आधाराने दिलीय असा प्रश्न वर्षा देशपांडे यांनी केला.

दरम्यान, डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्याचे पत्र आरोग्य विभागाला दिलंय. यासोबत यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी डॉ.ठक्कर यांच्याकडून करण्यात आली. तर, जसलोक हॉस्पिटलनं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. जसलोक हॉस्पिटलमधल्या IVF सेंटरच्या संचालिका डॉ. फिरुजा पारीख या कथित सरोगसीत त्या सहभागी नाहीत. यासंदर्भातल्या अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये, असं जसलोक हॉस्पिटलनं म्हटलंय.

जसलोक हॉस्पिटलचं स्पष्टीकरण

"जसलोक हॉस्पिटलमधल्या IVF सेंटरच्या संचालिका डॉ. फिरुजा पारीख यांनी शाहरुख आणि त्याच्या पत्नीसाठी सरोगसी केली नाही. त्यांच्या कथित सरोगसीत त्या सहभागी नाहीत. यासंदर्भातल्या अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2013 02:59 PM IST

ताज्या बातम्या