उद्या भारत-पाकमध्ये रंगणार 'कांटे की टक्कर'

उद्या भारत-पाकमध्ये रंगणार 'कांटे की टक्कर'

  • Share this:

india vs pak matchइंग्लंड जून 14 जून : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियासमोर लीगमध्ये आता आव्हान आहे ते कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं...स्पर्धेत सलग दोन विजय मिळवत टीम इंडियानं याआधीच सेमीफायनल गाठली आहे. याउलट सलग दोन पराभव पत्कारावे लागल्यानं पाकिस्तानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय.

त्यामुळे भारताच्या दृष्टीनं ही मॅच तितकी महत्वाची नसली तरीही या मॅचमधली उत्कंठा जराही कमी झालेली नाही.. उद्या बर्मिंगहममध्ये हाऊस फुल स्टेडियमसमोर हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी भिडतील.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय टीम मैदानात उतरणार आहे आणि पाकिस्तानवर विजय मिळवत स्पर्धेत विजयाची हॅट्‌ट्रीक करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल. भारतीय टीमचे युवा खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. सलग दोन सेंच्युरी करणारा शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक हे बॅट्समन चांगल्या फॉर्मात आहेत. दुसरीकडे पाकिस्तानची मदार असणार आहे ती बॉलिंगवर. त्यामुळे ही मॅच भारतीय बॅट्समन विरुद्ध पाकिस्तानी बॉलर्स अशी रंगणार आहे.

First published: June 14, 2013, 10:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading