बोडकेंचा राष्ट्रवादीला रामराम

बोडकेंचा राष्ट्रवादीला रामराम

13 जानेवारी, पुणेअद्वैत मेहताकुख्यात गुंड बाबा बोडके यानं अखेर एकाच दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी अजित पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ही बातमी आयबीएन - लोकमतनं दाखवून सतत दाखवून दिली आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण कसं होतं ही बाब लोकांसमोर आणली आहे. बोडकेचा भूतकाळ विसरून त्याला सुधारायला संधी दिली जावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांडली आहे. त्यामुळेच त्यांनी बोडकेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होतो. 34 वर्षांचा कमलाकर उर्फ बाबा बोडकेच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो पुणे जिल्ह्यातल्या भोर गावचा आहे. कमलाकरचा जन्म पुण्यातच झाला. त्याचे वडील गिरणी कामगार होते. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना पोलिसांनी बोडकेवर दोन खून आणि इतर गुन्ह्यांसाठी 2003 मध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. यासाठी पुणे कोर्टानं त्याला जन्मठेपही सुनावली होती. पण नंतर त्याला मुंबई हाय कोर्टातून जामीन मिळाला. ही केस अजूनही कोर्टात आहे. गेल्या वर्षी बोडकेला कोरेगाव पार्क मधल्या एका वयस्कर जोडप्याला धमकावण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणात त्याला नुकताच सेशन कोर्टातून जामीन मिळालाये. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा संदीप मोहोळ या गुंडाचा पूर्व वैमनस्यातून खून झाला होता. तोही बोडकेचा नातेवाईक होता. किडनॅपिंग, बेकायदा शस्त्र बाळगणं अशा अनेक गुन्ह्यांमध्ये तो संशयित आहे. त्यांच्यावर सध्या 3 ते 4 खटले सुरू आहेत. बोडके यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता. पण मोक्का अंतर्गत झालेल्या कारवाईमुळं त्याला बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर त्यानं आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अंधांना मदत, असे सामाजिक उपक्रम सुरूच ठेवले. त्यातूनच आता त्याला पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश मिळाला आहे. पण त्याला फारकाळ पक्षात राहता आलं नाही. बाबा बोडकेच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादी नेते अंकुश काकडे सांगतात, " राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:मुळे बदनाम होऊ नये तसंच पक्षाला स्वत:मुळे बदनाम करू नये म्हणून बाबा बोडकेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात स्वत:हून राजीनामा दिला. आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. एखादी व्यक्ती जर सुधारत असेल तर त्या व्यक्तीला सुधारण्याची संधी दिली पाहिजे, अशी सगळ्याच पक्षांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही बाबाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. पण त्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे प्रश्नच निकालात निघाला आहे. बाबा बोडकेंनी राष्ट्रवादीकडे जे निवेदन दिलं आहे, त्या निवेदनातून असं म्हटलं आहे की, राजकारणात येण्याची माझी कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती किंवा राष्ट्रवादीकडून माझी निवड व्हावी हीही माझी अपेक्षा नाहीये. सामाजिक काम करण्यासाठी मी पक्षात आलो होतो, असंही त्यांनी निवेदनात स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्यावर चर्चा करू नये असं मला वाटतं. त्यांच्या प्रवेशानं राष्ट्रवादीची बदनामी झाली आहे की नाहीये हा लोकांचा प्रश्न आहे. त्याबाबतीत जनता आम्हाला जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू. "बाबा बोडकेच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना निलम गो-हे म्हणाल्या, " बाबा बोडकेनं राजीनामा देणं हा मीडियाचाही इम्पॅक्ट आहे. लोकमत अजूनही जागृत आहे, असाही त्यामागचा अर्थ आहे. जन्मेठेपेची शिक्षा होणा-या आरोपीला निवडणुकीला उभं केलं जाऊ नये याचाही लोकांनी निषेध केला आहे. जर मीडिया आणि जनता एकत्र आली तर खूप काही घडू शकतं. इतक्या भयावह पद्धतीनं राजकाराणाचं गुन्हेगारीकरण होत आहे. ते ऐकून धक्काच बसला. " बोडकेसारख्या गुन्हेगाराला पक्षात घेतल्यानं भाजप नेते गोपनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर खरपूस टीका केली आहे. " वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी एकच पक्ष इतके का प्रयत्न करत आहे. सगळे वाल्मिकी आता राष्ट्रवादीत असणारंय की काय, " असा प्रश्न गोपीनाथ मुंडे यांनी विचारला होता.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2009 11:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading