IBN लोकमतची वेबसाईट नव्यारूपात

IBN लोकमतची वेबसाईट नव्यारूपात

  • Share this:

ibn lokmat website3मुंबई 13 जून : गेल्या चार वर्षांपासून इंटरनेट विश्वात आपला ठसा उमटवणार्‍या आमच्या वेबसाईटने आज नव्या रूपात वेब भरारी घेतली आहे. आयबीएन लोकमतची अधिकृत वेबसाईट www.ibnlokmat.tv आजपासून नव्या रंगात, नव्या ढंगात आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. त्यासोबतच बातम्या, व्हिडिओ, फोटो गॅलरी, कार्यक्रम हे तर आहेतच पण यासोबत नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून अहोरात्र सुरू असलेली आणि कायम अपडेट राहणारी आमची वेबसाईट राज्यासह देशा-विदेशातील वाचक/प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्रातील आणि देशा-विदेशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पोहोचवत आलीय आणि यापुढेही राहणार. जगभरातून 115 राष्ट्रातून आयबीएन लोकमतच्या वेबसाईटाला प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे.

वेबसाईटसोबतच आम्ही सोशल मीडियावरही आघाडीवर आहोत. आम्ही फेसबुक, ट्विटर, युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांशी थेट संवाद नियमितपणे साधत असतो. महाराष्ट्रच्या खेडोपाड्यात घडलेली घटना असो अथवा दिल्लीतील राजकीय आखाडा किंवा अमेरिकेत घडलेली एखादी 'ब्रेकिंग न्यूज..' देण्यात आयबीएन लोकमत नेहमी अव्वल राहिलं आहे आणि राहणार...पण हे सगळं होऊ शकलं वाचक हो आपल्यामुळे...त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा साद देतोय...चला, जग जिंकूया...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2013 07:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading