भाजपचे हे मंत्री वादात सापडण्याची शक्यता, ठाकरेंवर थेट केली टीका

भाजपचे हे मंत्री वादात सापडण्याची शक्यता, ठाकरेंवर थेट केली टीका

डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडण्याची शक्यता आहे.

  • Share this:

डोंबिवली, 1 जुलै- डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडण्याची शक्यता आहे. चव्हाण यांनी थेट ठाकरेंवर टीका केली आहे. त्यामुळे युतीच्या राज्यात चव्हाणांवर 'धनुष्यातून बाण' सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. 'ठाकरेंनी सांगितले म्हणून डोंबिवलीत कामे होत नाहीत!, असे वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. राज्यमंत्री चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. परंतु ठाकरे नेमके कोण? राज ठाकरे, उद्धव ठाकरे की आदित्य ठाकरे? हे मात्र अस्पष्ट आहे.

डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मात्र यावेळी त्यांनी थेट ठाकरेंवरच टीका केली आहे. भाषणात ते म्हणाले, डोंबिवलीत एखादे काम ठाकरेंनी सांगितलं म्हणून होत नाही. पण ठाकरे नेमके कोण? राज ठाकरे, उद्धव ठाकरे की आदित्य ठाकरे? हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. मागील निवडणुकीत तर शिवसेनेने त्यांना पाडण्यासाठी मोठा जोर लावला होता. मनसेने गेल्या काही दिवसांपासून टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी एका बाणात दोन पक्षी मारले की काय? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मात्र, सध्याच्या युतीच्या सरकारात राज्यमंत्री असलेल्या चव्हाणांवर धनुष्यातून बाण सुटू नये, म्हणजे झालं..!

'10 वर्षांत पूर्ण झालेला विनाघोटाळा प्रकल्प दाखवा आणि 501 रुपये घेऊन जा'

राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे गेल्या 10 वर्षांपासून डोंबिवलीचे प्रतिनिधित्व करत आहेत. चव्हाण यांच्या कार्यकाळात एक तरी प्रकल्प अथवा विकासकामे पूर्ण झाली आहे. तसेच पूर्ण झालेल्या विकास कामात कोणाताही घोटाळा झालेला नाही, कोणतीही चौकशी सुरू नाही, असा एखादा प्रकल्प दाखवावा आणि 501 रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) केले होते.

मनसेचे थेट राज्यमंत्री रवीद्र चव्हाण यांना आव्हान...

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी कल्याण-डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मुंबई मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत डोंबिवली शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर मनसेने रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपवर कडाडून टीका केली आहे. याबाबत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम आणि केडीएमसी गटनेते मंदार हळबे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली बैठक म्हणजे सत्तेच्या जोरावर भीती घालून तसेच ठरवून जबरदस्तीने घेतलेली बैठक असल्याची टीका केली. युतीमधील शिवसेनेच्या महापौर, आमदार, खासदार यामधील कोणालाही बैठकीत बोलवण्यात आले नसल्याबाबत आश्चर्यही व्यक्त केले आहे. रवींद्र चव्हाण यांचा आमदार, खासदार यांच्यावर विश्वास नाही का? असा सवाल केला. शिवसेना-भाजपच्या आपापसातील कुरघोडीच्या राजकारणात सुतिका गृह, शास्त्री नगर रुग्णालय, कल्याण-डोंबिवली शहरातील मच्छी मार्केट आदी प्रकल्प आजमितीला रखडले आहेत. काही प्रकल्पांच्या निविदाना प्रतिसाद मिळत नाही. ठेकेदाराना पालिकेसह सत्ताधाऱ्यांवर विश्वास उरलेला नाही. शिवसेना भाजप निवडणूक आली एकत्र येतात आणि विकास कामामध्ये श्रेयाचा राजकारण करत असल्याने अनेक विकास कामे रखडले आहेत. शिवसेना आणि आमदार याच्या भांडणात जनतेला विकास कामापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप केला आहे. डोंबिवलीतील चाकरमानी ट्रेनमध्ये लटकत प्रवास करतात त्यानंतर पुन्हा रस्ते मार्ग वाहतूक कोंडीत बंद आहेत. न कुठले मनोरंजन केंद्र आहे. स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नाट्यगृह बंद असतात. साडे चार वर्षे राज्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. या साडे चार वर्षांत डोंबिवलीसाठी त्यांनी मंत्री म्हणून कोणता प्रकल्प आणला. या 10 वर्षांत एक तरी प्रकल्प, विकासकामे पूर्ण झाली आहेत आणि पूर्ण झालेल्या विकास कामात कोणतही घोटाळा आणि कोणतीही चौकशी लागू नसेल, असे एक तरी विकास काम दाखवावे आणि राज्यमंत्री चव्हाण यांनी मनसेकडून 501 रुपयांचे बक्षीस घेऊन जावे, असे आव्हान मनसेने दिले होते.

VIDEO:'पाणी तुंबलं नाही? महापौरांनी चष्माच्या नंबर चेक करावा'

First published: July 1, 2019, 9:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading