खुशखबर, सोनं 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

खुशखबर, सोनं 'इतक्या' रुपयांनी झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

Gold Price, Silver Price -अमेरिका आणि चीनमधला व्यापारी तणाव थोडा निवळलाय. त्याचा परिणाम सोन्यावर झाला.

  • Share this:

मुंबई, 01 जुलै : अमेरिका आणि चीनमधला व्यापारी तणाव थोडा निवळलाय. त्याचा परिणाम सोन्यावर झाला. सोन्याची 130 रुपयांनी घसरण होऊन ते 34, 140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलंय. चांदीही 260 रुपयांचं नुकसान होऊन 38, 570 रुपये प्रति किलोग्रॅमवर आलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यामध्ये गिरावट होऊन 1, 388.09 डाॅलर्स प्रति औंस झालंय.

सोन्यात झालेल्या घसरणीची कारणं

अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारासंबंधी संवाद सुरू करण्याला सहमती दर्शवली गेलीय. त्यामुळे गुंतवणूकदार आता बाजारात गुंतवणूक करायला तयार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यात गुंतवणुकीचा कल कमी झालाय.

उद्या दिसणार वर्षातलं पहिलं खग्रास सूर्य ग्रहण; काय आहे वैशिष्ट्य?

सोन्याची नवी किंमत

99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 130-130 रुपयांनी घसरून क्रमश: 34,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 33, 970 रुपये प्रति ग्रॅमवर आलंय. शनिवारी सोनं 15 रुपयांनी घसरून 34,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 230 रुपयांनी वृद्धी होऊन 38, 830 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

मराठा आरक्षणाचं मुख्यमंत्र्यांनी मांडलं हे नवं विधेयक

चांदी झाली फिकी

चांदीचं 260 रुपयांनी नुकसान झालंय. चांदी आता 38,570 रुपये प्रति किलोग्रॅम आणि साप्ताहिक डिलिवरी 295 रुपयांनी घसरण होऊन 37,157 रुपये प्रति किलोग्रॅमवर आलीय. चांदीचे सिक्के 80 हजार रुपये आणि 81 हजार रुपये प्रति शेकडा कायम आहे.

मुंबईकरांसाठी दुसरी आनंदाची बातमी, 18 लाख लोकांना फायदा

गेल्या काही दिवसात अमेरिका आणि इराणमधल्या तणावामुळेही सोन्याच्या किमती वाढत होत्या. अमेरिकेनं व्याजदरात कपात केलीय. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं पसंत केलं होतं. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यानं उच्चांक गाठला होता. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला. दोन दिवसांपूर्वी एससीएक्सवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 797 रुपयांनी वधारून 33,876 रुपये झाला होता. चांदीचा भाव प्रति किलो 843 रुपयांनी वधारून 38,147 रुपये झाला होता. पण आता पुन्हा चित्र बदलतंय. सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळालाय.

ठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

First published: July 1, 2019, 8:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading