भिवंडी तालुक्यात मुसळधार...20 ते 25 गावांचा संपर्क तुटला

भिवंडी तालुक्यात मुसळधार...20 ते 25 गावांचा संपर्क तुटला

भिवंडी शहरासह तालुक्यात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

  • Share this:

भिवंडी, 1 जुलै- भिवंडी शहरासह तालुक्यात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भिवंडी-परोळ रोडवरील कांबा गावच्या हद्दीत रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. 20 ते 25 गावचा संपर्क तुटला आहे. बहुसंख्य नागरीक अडकून पडले आहेत.

आंबा, जुनांदूखी, टेंभवली, गाणे, फिरिंगपाडा, लखीवली, पालीवली, माजीवडा, धामणे, चिंबीपाडा, कुहे , खडकी, आंबराई, भुईशेत आदी गावाचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे खाडीचे आणि डोंगराचे पाणी परिसरात शिरल्याने शेत जमिनीत पाणीच पाणी झाले असून शेतकऱ्यांनी बांधलेले बांधारे सुद्धा वाहून गेले आहे. तसेच कामवारी नदीला पूर आल्याने शेलार परिसरात घरांमध्ये पाणी शिरले आहे.

कल्याण इमारतीचा काही भाग कोसळला..

कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने इमारत रिकामी असल्याने जीवितहानी झाली नाही. कल्याणच्या रामबाग परिसरात ही इमारत आहे.

फातिमा मंझिल असे या इमारतीचे नाव असून ही इमारत जवळपास 40 वर्षे जुनी आहे. ही इमारत धोकादायक बनल्याने केडीएमसीने रिकामी केली होती. आज दुपारी दोनच्या सुमारास अचानक या इमारतीचा काही भाग कोसळला. मात्र यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. यानंतर अग्निशमन दल आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली. दरम्यान, कल्याणमध्ये जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त धोकादायक इमारती असून त्यांचा प्रश्न या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे.

VIDEO : 51 फुटांची विठ्ठल मूर्ती साकारली केवळ 45 दिवसांत

First published: July 1, 2019, 6:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading