रेसकोर्सबाबत शिवसेना ठाम, राष्ट्रवादीचीही 'दौड'

रेसकोर्सबाबत शिवसेना ठाम, राष्ट्रवादीचीही 'दौड'

मुंबई 31 मे :मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या कराराची मुदत आज संपली. पण रेसकोर्सबाहेरची 'दौड' अजूनही सुरूच आहे. रेसकोर्सच्या जागेवर जनतेसाठी उद्यान व्हावं अशी भूमिका शिवसेनेनं पुन्हा एकदा आग्रहाने मांडली आणि त्यासाठी तयार केलेलं उद्यानाचं संकल्पचित्रही उद्धव ठाकरेंनी सादर केलं. आधी उद्यान होईल मग बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न आहे असं स्पष्टीकरण उद्धव यांनी दिलं. पण शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळाला नाही, असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितलं. तर रेसकोर्सच्या मुद्यावर तूर्तास निर्णय होणार नाही असं मुंबई पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईतील ह्रदयस्थनी असलेलं महालक्ष्मी रेसकोर्स. रेसकोर्सची साडे आठ लाख चौरस मीटर जागेचा गरीबांना काहीही उपयोग होत नाही, म्हणून तिथे उद्यान बांधावं अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे. 31 मे रोजी रेसकोर्सची लीज संपली आहे. ही लीज न वाढवता तिथं गार्डन बनवा अशी मागणी महापौर सुनील प्रभूंनी केली होती. या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बनवण्याचा शिवसेनेचा मनसुबा असून याला उद्धव ठाकरेंनीही दुजोरा दिलाय. बाळासाहेबांच्या स्मारकाचा आमचा प्रस्ताव नाही. पण असा प्रस्ताव कुणी ठेवणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल अस उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण रेसकोर्सवरच्या शिवसेनेच्या भूमिकेला राष्ट्रवादीने खोडा घातला. मुंबई रेसकोर्सची 8 लाख स्केअर फूटची जागा सरकारची आहे, सरकारचं म्हणणं विचारात घ्यावं लागले यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. सरकारकडून झालेल्या करारात काही चुका झाल्या आहेत पण त्यात दुरुस्ती सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. पवारांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार हे घोडेवाल्यांसोबतच जातील. आता हे घोडेवाले कोण आहेत हे सर्वांना माहित आहे असा टोला उद्धव यांनी लगावला. रेसकोर्स जर चालवायचे असेल तर मुंबई बाहेर सुरू करावे अशी मागणीही उद्धव यांनी केली होती. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेऊन रेसकोर्सवरील उद्यानाचं संकल्पचित्र सादर केलं. एवढ्या मोठ्या जागेचा जनतेच्या फायदेशीर काही तरी झालं पाहिजे. उद्यान जर झालं तर त्याचा फायदा जनतेलाच होईल. त्यामुळे शासनाने यात पुढाकार घ्यावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक होईल का ? असा सवाल केला असता उद्यान झाल्यानंतरचा हा प्रश्न आहे असं उत्तर उद्धव यांनी दिलं. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही, असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितलं. तर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जर्नादन चांदूरकर यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. मात्र रेसकोर्सच्या मुद्यावर तूर्तास निर्णय होणार नाही, असं मुंबई पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीच रेसकोर्सवरची दौड थांबली असून रेसकोर्सबाहेरची नवी 'दौड' सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई 31 मे :मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या कराराची मुदत आज संपली. पण रेसकोर्सबाहेरची 'दौड' अजूनही सुरूच आहे. रेसकोर्सच्या जागेवर जनतेसाठी उद्यान व्हावं अशी भूमिका शिवसेनेनं पुन्हा एकदा आग्रहाने मांडली आणि त्यासाठी तयार केलेलं उद्यानाचं संकल्पचित्रही उद्धव ठाकरेंनी सादर केलं. आधी उद्यान होईल मग बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न आहे असं स्पष्टीकरण उद्धव यांनी दिलं. पण शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळाला नाही, असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितलं. तर रेसकोर्सच्या मुद्यावर तूर्तास निर्णय होणार नाही असं मुंबई पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील ह्रदयस्थनी असलेलं महालक्ष्मी रेसकोर्स. रेसकोर्सची साडे आठ लाख चौरस मीटर जागेचा गरीबांना काहीही उपयोग होत नाही, म्हणून तिथे उद्यान बांधावं अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे. 31 मे रोजी रेसकोर्सची लीज संपली आहे. ही लीज न वाढवता तिथं गार्डन बनवा अशी मागणी महापौर सुनील प्रभूंनी केली होती. या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बनवण्याचा शिवसेनेचा मनसुबा असून याला उद्धव ठाकरेंनीही दुजोरा दिलाय.

बाळासाहेबांच्या स्मारकाचा आमचा प्रस्ताव नाही. पण असा प्रस्ताव कुणी ठेवणार असेल तर त्याला आमचा पाठिंबा असेल अस उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पण रेसकोर्सवरच्या शिवसेनेच्या भूमिकेला राष्ट्रवादीने खोडा घातला. मुंबई रेसकोर्सची 8 लाख स्केअर फूटची जागा सरकारची आहे, सरकारचं म्हणणं विचारात घ्यावं लागले यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. सरकारकडून झालेल्या करारात काही चुका झाल्या आहेत पण त्यात दुरुस्ती सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पवारांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार हे घोडेवाल्यांसोबतच जातील. आता हे घोडेवाले कोण आहेत हे सर्वांना माहित आहे असा टोला उद्धव यांनी लगावला. रेसकोर्स जर चालवायचे असेल तर मुंबई बाहेर सुरू करावे अशी मागणीही उद्धव यांनी केली होती. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाभवनात पत्रकार परिषद घेऊन रेसकोर्सवरील उद्यानाचं संकल्पचित्र सादर केलं. एवढ्या मोठ्या जागेचा जनतेच्या फायदेशीर काही तरी झालं पाहिजे. उद्यान जर झालं तर त्याचा फायदा जनतेलाच होईल. त्यामुळे शासनाने यात पुढाकार घ्यावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

रेसकोर्सवर बाळासाहेबांचं स्मारक होईल का ? असा सवाल केला असता उद्यान झाल्यानंतरचा हा प्रश्न आहे असं उत्तर उद्धव यांनी दिलं. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही, असं नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितलं. तर याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जर्नादन चांदूरकर यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. मात्र रेसकोर्सच्या मुद्यावर तूर्तास निर्णय होणार नाही, असं मुंबई पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीच रेसकोर्सवरची दौड थांबली असून रेसकोर्सबाहेरची नवी 'दौड' सुरू झाली आहे.

First published: May 31, 2013, 3:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading