'निवडणुकांसाठी कामाला लागा'

'निवडणुकांसाठी कामाला लागा'

27 एप्रिलमुंबई: केंद्रातील युपीए सरकारचं बहुमत काठावर आलंय, त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीला तयार राहण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. तसंच आगामी निवडणूक ही काँग्रेससोबतच लढणार असंंही पवारांनी स्पष्ट केलं. यूपीए सरकार अल्पमतात आहे ही खरी परिस्थिती आहे. यूपीएला काही पक्षांचा बाहेरून पाठिंबा आहे पण त्यांच्याही काही अटी, शर्ती आहे त्यामुळे ते कधीही पाठिंबा काढू शकता. त्यामुळे मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते. यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कामावर लागण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. यावेळीही आम्ही 22 जागांवर लढणार असंही मलिक यांनी सांगितलं. यूपीए सरकारमधून तृणमूल काँग्रेस आणि नंतर करूणानिधी यांनी पाठिंबा काढल्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे यूपीएचा प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता मुदतपूर्व निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत दोन दिवस मुक्काम ठोकून सर्व नेत्या,पदाधिकार्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीत मुदतपूर्व निवडणुकीवर चर्चा झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत लढवलेल्या 22 लोकसभा मतदार संघातील परिस्थितीचा आढाव घेतला. राष्ट्रवादीने 2009 मध्ये 22 जागांवर निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांना आठच जागा जिंकता आल्या होत्या. गमावलेल्या 14 मतदारसंघांची सध्याची स्थिती कशी आहे, तिथं संभाव्य उमेदवार कोण असू शकतात अशा अनेक पैलूंची चाचपणी शरद पवारांनी केली. या सगळ्या 22 जागांवर तगडे उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी मतदारसंघाची धुरा सांभाळणार असल्याची शक्यता आहे. तसंच मागिल निवडणुकीत गमावलेल्या 14 जागा पुन्हा एकदा बळकावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काही मतदारसंघ काँग्रेसबरोबर अदलाबदल करणार आहे. दुसरीकडे भ्रष्टाचार,गैरव्यवहाराच्या आरोपात सापडलेले जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या आखाड्यात सोडण्याचा शरद पवारांचा इरादा आहे. बड्या नेत्यांच्या यादीत आर.आर. पाटील, जयदत्त क्षीरसागर, बबनराव पाचपुते, रामराजे निंबाळकर, गणेश नाईक, राजेश टोपे आदींना उमेदवारी देण्याचा पवारांचा विचार आहे. शरद पवारांनी सर्व मतदार संघाचा आढावा घेत सर्व कार्यकर्ते,नेत्यांना कामावर लागण्याचे आदेश दिले आहे. राष्ट्रवादीने आता स्पष्टपणे मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिल्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचा अजेंडा- मुदतपूर्व निवडणुकीला तयार राहा - शरद पवारांच्या सूचना- शरद पवारांनी घेतला 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा- काँग्रेसबरोबरच आघाडीचा विचार- गेल्यावेळी गमावलेल्या 14 जागांवर विशेष लक्ष- 14 मधल्या बहुतेक जागांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा नाही- सर्व 22 ठिकाणी तगडे उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न- काही मंत्र्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवणार- छगन भुजबळ, आर.आर. पाटील, सुनील तटकरे, जयदत्त क्षीरसागर, बबनराव पाचपुते, रामराजे निंबाळकर, गणेश नाईक, राजेश टोपे आदींना उमेदवारी देण्याचा पवारांचा विचार- काही मतदारसंघांची काँगे्रसबरोबर अदलाबदल करणार- जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतल्या यशाच्या जोरावर काही जागा वाढवून घेण्याचा नेत्यांचा पवारांकडे आग्रह

  • Share this:

27 एप्रिल

मुंबई: केंद्रातील युपीए सरकारचं बहुमत काठावर आलंय, त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीला तयार राहण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. तसंच आगामी निवडणूक ही काँग्रेससोबतच लढणार असंंही पवारांनी स्पष्ट केलं. यूपीए सरकार अल्पमतात आहे ही खरी परिस्थिती आहे. यूपीएला काही पक्षांचा बाहेरून पाठिंबा आहे पण त्यांच्याही काही अटी, शर्ती आहे त्यामुळे ते कधीही पाठिंबा काढू शकता. त्यामुळे मुदतपूर्व निवडणूक होऊ शकते. यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना कामावर लागण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. यावेळीही आम्ही 22 जागांवर लढणार असंही मलिक यांनी सांगितलं. यूपीए सरकारमधून तृणमूल काँग्रेस आणि नंतर करूणानिधी यांनी पाठिंबा काढल्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे यूपीएचा प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता मुदतपूर्व निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत दोन दिवस मुक्काम ठोकून सर्व नेत्या,पदाधिकार्‍यांनी बैठक घेतली. या बैठकीत मुदतपूर्व निवडणुकीवर चर्चा झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत लढवलेल्या 22 लोकसभा मतदार संघातील परिस्थितीचा आढाव घेतला.

राष्ट्रवादीने 2009 मध्ये 22 जागांवर निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांना आठच जागा जिंकता आल्या होत्या. गमावलेल्या 14 मतदारसंघांची सध्याची स्थिती कशी आहे, तिथं संभाव्य उमेदवार कोण असू शकतात अशा अनेक पैलूंची चाचपणी शरद पवारांनी केली. या सगळ्या 22 जागांवर तगडे उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे. यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी मतदारसंघाची धुरा सांभाळणार असल्याची शक्यता आहे. तसंच मागिल निवडणुकीत गमावलेल्या 14 जागा पुन्हा एकदा बळकावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काही मतदारसंघ काँग्रेसबरोबर अदलाबदल करणार आहे.

दुसरीकडे भ्रष्टाचार,गैरव्यवहाराच्या आरोपात सापडलेले जेष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या आखाड्यात सोडण्याचा शरद पवारांचा इरादा आहे. बड्या नेत्यांच्या यादीत आर.आर. पाटील, जयदत्त क्षीरसागर, बबनराव पाचपुते, रामराजे निंबाळकर, गणेश नाईक, राजेश टोपे आदींना उमेदवारी देण्याचा पवारांचा विचार आहे. शरद पवारांनी सर्व मतदार संघाचा आढावा घेत सर्व कार्यकर्ते,नेत्यांना कामावर लागण्याचे आदेश दिले आहे. राष्ट्रवादीने आता स्पष्टपणे मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिल्यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

राष्ट्रवादीचा अजेंडा

- मुदतपूर्व निवडणुकीला तयार राहा - शरद पवारांच्या सूचना- शरद पवारांनी घेतला 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा- काँग्रेसबरोबरच आघाडीचा विचार- गेल्यावेळी गमावलेल्या 14 जागांवर विशेष लक्ष- 14 मधल्या बहुतेक जागांच्या परिस्थितीत फारशी सुधारणा नाही- सर्व 22 ठिकाणी तगडे उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न- काही मंत्र्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवणार- छगन भुजबळ, आर.आर. पाटील, सुनील तटकरे, जयदत्त क्षीरसागर, बबनराव पाचपुते, रामराजे निंबाळकर, गणेश नाईक, राजेश टोपे आदींना उमेदवारी देण्याचा पवारांचा विचार- काही मतदारसंघांची काँगे्रसबरोबर अदलाबदल करणार- जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतल्या यशाच्या जोरावर काही जागा वाढवून घेण्याचा नेत्यांचा पवारांकडे आग्रह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2013 01:39 PM IST

ताज्या बातम्या