वसई विरारकरांच्या मोर्चाची विधानभवनाकडे आगेकूच

वसई विरारकरांच्या  मोर्चाची विधानभवनाकडे आगेकूच

19 एप्रिलवसई विरार महापालिकेतून 35 गावं वगळावी असा सरकारचा निर्णय झालेला असूनही अंतिम अधिसूचना अजूनही निघालेली नाही. ही अधिसूचना तत्काळ काढावी या मागणीसाठी वसई जनआंदोलन समितीने विधानभवनावर धडक मोर्चा काढला आहे. मात्र वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर या मोर्चादरम्यान आमदार विवेक पंडित यांना चक्कर आली. पंडित यांची तब्येत खालावल्याने त्यांना डॉक्टरांनी पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगितलंय. पण आंदोलनाच्या भूमिकेवर पंडित ठाम आहेत. सी लिंकवर जाण्याची परवानगी आंदोलकांना सुरूवातीला नाकारण्यात आली होती. पण नंतर त्यांना परवानगी देण्यात आली. आज हे मोर्चेकरी वरळीला मुक्काम करणार आहेत.

  • Share this:

19 एप्रिल

वसई विरार महापालिकेतून 35 गावं वगळावी असा सरकारचा निर्णय झालेला असूनही अंतिम अधिसूचना अजूनही निघालेली नाही. ही अधिसूचना तत्काळ काढावी या मागणीसाठी वसई जनआंदोलन समितीने विधानभवनावर धडक मोर्चा काढला आहे. मात्र वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर या मोर्चादरम्यान आमदार विवेक पंडित यांना चक्कर आली. पंडित यांची तब्येत खालावल्याने त्यांना डॉक्टरांनी पूर्णपणे विश्रांती घ्यायला सांगितलंय. पण आंदोलनाच्या भूमिकेवर पंडित ठाम आहेत. सी लिंकवर जाण्याची परवानगी आंदोलकांना सुरूवातीला नाकारण्यात आली होती. पण नंतर त्यांना परवानगी देण्यात आली. आज हे मोर्चेकरी वरळीला मुक्काम करणार आहेत.

First published: April 19, 2011, 11:18 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading