06 डिसेंबर : कोल्हापूरमध्ये पुन्हा टोलविरोधात आंदोलन पेटणार आहे. उद्या शनिवारी टोलविरोधात पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शहरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोल विरोधी कृती समिती ठिय्या आंदोलन करणार आहे.
या आंदोलनाला आता वकिलांनीही पाठिंबा दिलाय. आज शहरातल्या सत्र न्यायालयासमोरच्या सगळ्या चारचाकी गाड्यांना टोल देणार नाही अशा आशयाची स्टिकर्स चिकटवून नागरिकांच्या आंदोलनात वकिलांचाही सहभाग असल्याचं स्पष्ट केलं.
'आज ना उद्या मी पण फोर व्हीलर घेणार मात्र त्याआधी हा टोल रद्द करणार' अशा वाक्यांची स्टिकर्सही गाड्यांवर चिकटवण्यात आली. कोल्हापूर शहरातल्या टोलविरोधी आंदोलनाला आता व्यापक स्वरुप मिळतंय. या आंदोलनात लाखो नागरिक सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.