30 एप्रिलमुंबई : राज्यात सिंचन प्रकल्पांच्या घोटाळ्यासारखाच आणखी एक मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. 2006 पासून 9 थर्मल ऊर्जा प्रकल्पांमध्ये वीजनिर्मितीवर एकूण 19 हजार 672 कोटी खर्च झाले आहेत. पण इतका खर्च होऊनही वीजनिर्मितीच्या क्षमतेत मात्र काहीही वाढ झालेली नाही, असं तावडे म्हणालेत. या वीजनिर्मिती घोटळ्याची माहिती आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देणार आहोत आणि या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं.