मुक्या जनावरांसाठी केला जाणार टँकरने पाणी पुरवठा

जालना (23 एप्रिल): राज्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तिथे मुक्या प्राण्यांचे अतोनात हाल होतं आहे. वाढत्या दुष्काळामुळे अभयारण्यातले जलाशयही आता कोरडे पडू लागले आहेत. वन्य प्राण्यांना पाणी मिळणं कठीण झालंय. पाणी न मिळल्यामुळे या मुक्या प्राण्यांना जीव गमवल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. अखेरीस वनविभागाने पाऊल उचलत अभयरण्यातील कोरडे पडलेल्या पाणवठ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. राज्यात एकूण दहा अभयारण्य आहेत, तिथं आता टँकरने पाणी पुरवलं जाईल. यासाठी वनविभागानं एक कोटी रुपयाची तरतूद केली आहे, अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे.

  • Share this:

First published: April 23, 2013, 2:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या