तुमचे केस गळतात का? करा 'हे' घरगुती उपाय

तुमचे केस गळतात का? करा 'हे' घरगुती उपाय

केस मूळापासून घट्ट करण्यासाची क्षमता नैसर्गिक मेंदीमध्ये असते.

  • Share this:

मुंबई, 25 मे : केस मूळापासून घट्ट करण्यासाची क्षमता नैसर्गिक मेंदीमध्ये असते. मेंदीचा वापर हा शक्यतोवर केसांना रंगविण्यासाठी केला जातो. केसगळतीवर रामबाण उपाय असल्यामुळे मेंदीचा वापर हा हेअर पॅकमध्येसुद्धा केला जातो. आज आम्ही तुम्हाला मेंदीचा वापर करून केसगळती कशी थांबवता येईल याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

1 - मोहरीच्या 250 ग्रॅम तेलात 60 ग्राम मेंदिची पानं घाला आणि ते मिश्रण उकळा. उकळलेलं हे मिश्रण गाळून, दररोज थोडं थोडं तेल डोक्याला लावून हलक्या हाताने मालिश करा. असं रोज केल्याने केसगळती थांबते.

डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

2 - केसांची मुळं घट्ट करणारे तत्त्व नैसर्गिक मेंदीमध्ये असतातच. अर्धा कप दह्यात सुकलेली मेंदी पावडर मिसळा. तासाभरानंतर हे मिश्रण केसांना लावा आणि तासाभरानंतर केस धुऊन टाका.

3 - मेंदी आणि आवळा एकत्र करून लावल्याने केसांना प्रोटीन मिळतं. मेंदी आणि आवळ्याचं मिश्रण हे केसांना घट्ट करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यातले व्हिटॅमिनमळे केसांची झपाट्याने वाढ होते. एक आवळा, तीन मोठे चमचे मेंदी आणि दोन मोठ चमचे मेथीचे दाणे अकत्र करून त्याचं मिश्रण तयार करून ते केसांना लावा आणि तासाभराने धुऊन टाका.

सकाळी उठल्यावर झोप नीट झाली नाही असं वाटतं? वेळीच लक्ष द्या हे असू शकतं कारण

4 - अंड्यातील पांढरा भाग आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यात मेंदी कालवाली. तासभरानंतर हे मिश्रण केसांना लावा. हे हेअर पॅक तासभर तसंच राहू द्या आणि नंचक धुऊन टाका. यामुळे सेसं मुळापासून घट्ट आणि चमकदार बनतात.

First published: May 25, 2019, 7:21 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading