• होम
  • व्हिडिओ
  • माझी प्रकृत्ती उत्तम, चिंतेचं कारण नाही -पवार
  • माझी प्रकृत्ती उत्तम, चिंतेचं कारण नाही -पवार

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 28, 2013 03:21 PM IST | Updated On: Mar 28, 2013 03:21 PM IST

    28 मार्चमाझी प्रकृती उत्तम असून चिंतेचं कोणतही कारण नसल्याचं खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार सध्या बंगळुरू, ऊटी आणि म्हैसूरच्या नियोजित दौर्‍यावर आहेत. गेल्या काही दिवसात पवारांची प्रकृती बरी नसल्याची चर्चा सुरु होती त्यावर स्वत: शरद पवारांनी खुलासा केला. या सगळ्या चर्चा विनोदत्मक आहे असा टोलाही त्यांनी लगावला. आज सकाळीही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शरद पवार यांची प्रकृती उत्तम असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. मागिल आठवड्यात शरद पवार कोल्हापुरातील सरपंच महापरिषदेच्या उद्धाटन समारंभाला उपस्थित होते. मात्र सरकारी विश्रामगृहावर गेले असता पवारांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अन्य काही चाचण्यासाठी हेलिकॉप्टरने पुण्याला हलवण्यात आले होते. पुण्यातील निवासस्थानी डॉ. रवी बापट यांनी पवारांची तपासणी केली. शरद पवार यांची प्रकृती ठिकाठाक असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांच्या तब्येतीबद्दल काही अफवाही पसरल्या होत्या. अखेर खुद्द शरद पवार यांनाच याबद्दल खुलासा द्यावा लागला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी