शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करत विरोधकांचा सभात्याग

शेतकरी कर्जमुक्तीची मागणी करत विरोधकांचा सभात्याग

  • Share this:

vidhan

14 जुलै : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही विरोधकांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यावरुन जोरदार आंदोलन केलं. जोपर्यंत शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नाही, असं म्हणत विरोधकांनी सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार घातला. आज तत्काळ शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आणि कर्जावर विधिमंडळात चर्चा घडवून आणावी अशी मागणी करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलं.

आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरू होताच विरोधक आमदारांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत पायर्‍यांवरच आंदोलन सुरू केलं. त्यावेळी फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. तर विधान परिषदेचं कामकाजसुद्धा 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. या कालावधीत विधानसभेच्या विरोधीपक्ष सदस्यांनी टीकात्मक, प्रतिकात्मक सभागृहाचं कामकाज सुरू केलं. विधानपरिषदेतलं इतर कामकाज बाजूला सारा आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा, अशी मागणी सुनील तटकरे यांनी केली. तर राज्य सरकारवर विश्वास उरला नाही, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.

First published: July 14, 2015, 4:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या