म्हाडाच्या घरांसाठी 31 मे रोजी लॉटरी

म्हाडाच्या घरांसाठी 31 मे रोजी लॉटरी

04 एप्रिलमुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणार्‍यांसाठी आनंदाची बातमी...हो नाही म्हणत येत्या 31 मे रोजी म्हाडाच्या घरांची लॉटरीची सोडत निघणार आहे. या वर्षी म्हाडा मुंबई मंडळाच्या 1100 हून अधिक घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. मुंबईतील पवई, तुंगा, मागाठणे, चारकोप या ठिकाणी असलेल्या घरांचा यात समावेश आहे. सर्व उत्पन गटांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे. यंदाच्या वर्षीही ऑनलाईन पद्धतीने घरांसाठी फॉर्म भरता येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यंदाच्या वर्षी म्हाडाची लॉटरी निघणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र म्हाडाने 1100 घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना दिलासा दिलाय. पण दुसरीकडे मागील वर्षी निघालेल्या सोडतीमधील घरधारकांना वर्ष उलटून गेले अजूनही घर मिळाले नाही.

  • Share this:

04 एप्रिल

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणार्‍यांसाठी आनंदाची बातमी...हो नाही म्हणत येत्या 31 मे रोजी म्हाडाच्या घरांची लॉटरीची सोडत निघणार आहे. या वर्षी म्हाडा मुंबई मंडळाच्या 1100 हून अधिक घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. मुंबईतील पवई, तुंगा, मागाठणे, चारकोप या ठिकाणी असलेल्या घरांचा यात समावेश आहे. सर्व उत्पन गटांसाठी ही लॉटरी काढली जाणार आहे. यंदाच्या वर्षीही ऑनलाईन पद्धतीने घरांसाठी फॉर्म भरता येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यंदाच्या वर्षी म्हाडाची लॉटरी निघणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र म्हाडाने 1100 घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना दिलासा दिलाय. पण दुसरीकडे मागील वर्षी निघालेल्या सोडतीमधील घरधारकांना वर्ष उलटून गेले अजूनही घर मिळाले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 02:41 PM IST

ताज्या बातम्या