प्रशासन झोपेत, 200 कोटींचं धान वाया !

प्रशासन झोपेत, 200 कोटींचं धान वाया !

महेश तिवारी, गडचिरोली29 मार्चगडचिरोली : एकीकडे महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट ओढवलंय. तर दुसरीकडे गडचिरोलीमध्ये प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 200 कोटींचं धान (भात) वाया जाण्याच्या मार्गावर आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा या तीनही जिल्ह्यांत तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. हे धान शेतकर्‍यांकडून स्थानिक आदिवासी कार्यकारी संस्था घेतात. आणि त्यांच्याकडून हे धान आदिवासी विकास महामंडळ घेतं. 2010 पासून 2012 पर्यंत पूर्व विदर्भात सुमारे 200 कोटी धानाची खरेदी झाली. पण दुर्गम भागात तात्पुरत्या गोदामात हे धान ठेवण्यात आलं. आणि त्यावर ताडपत्री झाकण्यात आली. पण धान खरेदी केंद्रावरून भात गिरण्यांपर्यंतच्या वाहतुकीचा योग्य दर ठरविला गेला नाही. त्यामुळे धानाची उचल झालीच नाही.धानाला योग्य भाव देण्यासाठी दुर्गम भागात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्यासाठीच एवढ्या मोठ्या प्रमाणात धानाची खरेदीही करण्यात आली. पण पुढे मात्र त्याची नासाडीच झाली. राज्यात दुष्काळ पडला असताना आणि कुपोषित मुलांची संख्या वाढत असताना हे धान वाया जातंय. पण प्रशासनाला मात्र त्याची फिकीर नाही.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली

29 मार्च

गडचिरोली : एकीकडे महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट ओढवलंय. तर दुसरीकडे गडचिरोलीमध्ये प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 200 कोटींचं धान (भात) वाया जाण्याच्या मार्गावर आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा या तीनही जिल्ह्यांत तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. हे धान शेतकर्‍यांकडून स्थानिक आदिवासी कार्यकारी संस्था घेतात. आणि त्यांच्याकडून हे धान आदिवासी विकास महामंडळ घेतं. 2010 पासून 2012 पर्यंत पूर्व विदर्भात सुमारे 200 कोटी धानाची खरेदी झाली. पण दुर्गम भागात तात्पुरत्या गोदामात हे धान ठेवण्यात आलं. आणि त्यावर ताडपत्री झाकण्यात आली. पण धान खरेदी केंद्रावरून भात गिरण्यांपर्यंतच्या वाहतुकीचा योग्य दर ठरविला गेला नाही. त्यामुळे धानाची उचल झालीच नाही.

धानाला योग्य भाव देण्यासाठी दुर्गम भागात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्यासाठीच एवढ्या मोठ्या प्रमाणात धानाची खरेदीही करण्यात आली. पण पुढे मात्र त्याची नासाडीच झाली. राज्यात दुष्काळ पडला असताना आणि कुपोषित मुलांची संख्या वाढत असताना हे धान वाया जातंय. पण प्रशासनाला मात्र त्याची फिकीर नाही.

First published: March 29, 2013, 2:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या