विधानभवनात आमदारांची API ला मारहाण

विधानभवनात आमदारांची API ला मारहाण

19 मार्चमुंबई : आज विधानभवनात आमदारांनी एपीआयला जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आमदार बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम आणि सेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल, भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. सूर्यवंशी यांनी शिविगाळ केली होती म्हणून मारहाण केली असं सांगण्यात येतं आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. मारहाणीत एपीआय सचिन सूर्यवंशीला मुका मार लागलाय. त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आमदारांनी विधानसभेत गदारोळ घातला. पोलिसांच्या वागणुकीविषयी त्यांनी तक्रार केली. मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी विधानसभा अध्यक्षांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. दुसरीकडे, आमदारांच्या या वर्तणुकीचा सर्व पक्षांनी निषेध केलाय. वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे नालासोपार्‍याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्याशी सोमवारी सी लिंकवर भांडण झालं होतं. एका एपीआय सोबत झालेल्या भांडणामुळे ठाकूर दुखावले गेले होते. त्यांनी थेट विधानसभेत सूर्यवंशीविरोधात तक्रार दाखल केली आणि सूर्यवंशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. एवढे होऊन सुद्धा क्षितीज ठाकूर यांनी आज विधानसभेत त्याच्या विरूद्ध हक्कभंगचा प्रस्ताव सादर केला. यावेळी सूर्यवंशी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. सूर्यवंशी यांनी गॅलरीतून आमदारांना शिविगाळ केली. यानंतर ठाकूर यांच्यासह राम कदम, औरंगाबादचे सेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल,ााजपचे आमदार जयकुमार रावल यांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन सूर्यवंशींना बेदम मारहाण देत बाहेर काढले. सूर्यवंशी यांना अमानूष मारहाण केली. आमदारांनी त्यांच्या गुप्तांगावर मारहाण केलीय. या मारहाणीत सूर्यवंशी बेशुद्ध पडले होते. त्यांना स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला हलवण्यात आलंय. त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदारांकडून एका पोलीस एपीआयला झालेल्या मारहाणीचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. विरोध पक्ष नेते विनोद तावडे यांनी घटनेचा निषेध केला आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीस अधिकार्‍यांला मारहाणची निषेध केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

  • Share this:

19 मार्च

मुंबई : आज विधानभवनात आमदारांनी एपीआयला जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आमदार बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, मनसेचे आमदार राम कदम आणि सेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल, भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी एपीआय सचिन सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. सूर्यवंशी यांनी शिविगाळ केली होती म्हणून मारहाण केली असं सांगण्यात येतं आहे. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. मारहाणीत एपीआय सचिन सूर्यवंशीला मुका मार लागलाय. त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर आमदारांनी विधानसभेत गदारोळ घातला. पोलिसांच्या वागणुकीविषयी त्यांनी तक्रार केली. मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी विधानसभा अध्यक्षांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. दुसरीकडे, आमदारांच्या या वर्तणुकीचा सर्व पक्षांनी निषेध केलाय.

वरळी वाहतूक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचे नालासोपार्‍याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्याशी सोमवारी सी लिंकवर भांडण झालं होतं. एका एपीआय सोबत झालेल्या भांडणामुळे ठाकूर दुखावले गेले होते. त्यांनी थेट विधानसभेत सूर्यवंशीविरोधात तक्रार दाखल केली आणि सूर्यवंशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. एवढे होऊन सुद्धा क्षितीज ठाकूर यांनी आज विधानसभेत त्याच्या विरूद्ध हक्कभंगचा प्रस्ताव सादर केला. यावेळी सूर्यवंशी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. सूर्यवंशी यांनी गॅलरीतून आमदारांना शिविगाळ केली. यानंतर ठाकूर यांच्यासह राम कदम, औरंगाबादचे सेनेचे आमदार प्रदीप जैयस्वाल,ााजपचे आमदार जयकुमार रावल यांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन सूर्यवंशींना बेदम मारहाण देत बाहेर काढले. सूर्यवंशी यांना अमानूष मारहाण केली. आमदारांनी त्यांच्या गुप्तांगावर मारहाण केलीय. या मारहाणीत सूर्यवंशी बेशुद्ध पडले होते. त्यांना स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला हलवण्यात आलंय. त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आमदारांकडून एका पोलीस एपीआयला झालेल्या मारहाणीचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे. विरोध पक्ष नेते विनोद तावडे यांनी घटनेचा निषेध केला आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीस अधिकार्‍यांला मारहाणची निषेध केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

First published: March 19, 2013, 10:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading