IPL तर संपलं पण अजूनही 'रनआउट'ची भीती, पाहा VIDEO

IPL तर संपलं पण अजूनही 'रनआउट'ची भीती, पाहा VIDEO

आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनी, वॉटसन धावबाद झाले आणि चेन्नईने सामन्यासह विजेता होण्याची संधी गमावली.

  • Share this:

मुंबई, 16 मे : काही घटनांवर सोशल मीडियावर येणाऱ्या प्रतिक्रिया अनेकदा मजेशीर असतात. यात फक्त टेक्स्ट किंवा फोटोच नाही तर व्हिडीओसुद्धा असतात. आयपीएल संपल्यानंतर अनेक मीम्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केले जात होते.

आयपीएल झाल्यानंतर अजुनही अश्विनच्या मंकडिंगसह रनआउटची दहशत अजूनही असल्याचं दाखवणारे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. नेटकऱ्यांनी रनआउट होण्यापासून वाचण्यासाठी उपाय सुचवला असला तरी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंमलात आणता येणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धाव घेण्यासाठी गाड्यांचा वापर केला असल्याचं दिसतं. एका व्हिडीओमध्ये दुचाकी तर एका व्हिडीओत चक्क ट्रक वापरले आहेत.

आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला होता. त्याच्याशिवाय सलामीचा फलंदाज शेन वॉटसनसुद्धा धावबाद झाला. त्यानंतर मुंबईने हा सामना एका धावेनं जिंकला होता.

मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर चेन्नईला पराभूत करून चौथ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. त्यांच्या विजयाची जितकी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा चेन्नईच्या पराभवाची आणि धोनीच्या बाद होण्याची झाली. हैदराबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने 150 धावांचे आव्हान चेन्नईला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती. त्यावेळी मुंबईचा गोलंदाज लसिथ मलिंगाने शार्दुल ठाकुरला बाद करून संघाला विजय मिळवून दिला.

धोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला होता. यावेळी रिप्लेमध्ये एका कॅमेऱ्यात धोनी क्रिजमध्ये तर दुसऱ्या बाजूने तो बाहेर असल्याचं दिसत होतं. यामुळे वादही निर्माण झाला होता.

वाचा : IPL 2019 : हरभजनबद्दल धोनीच्या त्या निर्णय़ाने चेन्नईचा पराभव?

VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार

First published: May 16, 2019, 6:43 PM IST

ताज्या बातम्या