सायनाने सिंधूला हरवलं, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं

सायनाने सिंधूला हरवलं, राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या महिला गटाच्या अंतिम लढतीचा सामना अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला.

  • Share this:

08 नोव्हेंबर : राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही.सिंधूचा पराभव करत सायना नेहवाल हिने अजिंक्यपद पटकावलंय. सायनाने सिंधूंचा २१-१७, २७-२५ अशा फरकाने पराभव केला.

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्यावतीने नागपूरच्या मानकापूर इनडोअर स्पोर्ट स्टेडियम इथं ८२ व्या सिनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. विश्व क्रमवारीत ११ व्या क्रमवारीत ११ व्या क्रमांकांवर असलेली सायना नेहवाल आणि रिओ आॅलिप्लिक मधील रौप्यपदक विजेती पी व्ही सिंधू यांच्यातील अंतिम सामना रोमांचक ठरला. सायनाने पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासून आघाडी घेतली. सिंधूने केलेल्या चुकांचा पुरेपुर फायदा घेत सायनाने पहिला गेम २१-१७ ने जिंकला.

तर दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने सुरुवातीपासून आघाडी घेतली. काही उत्कृष्ट ड्राप्सही तिने लगावले. १८ पॉईंट्सपर्यंत ती आघाडीवर होती. त्यानंतर सायनाने कमबॅक करत बरोबरी साधली. अखेर सायनाने आपला अनुभव पणास लावून २७-२५ अशी सरशी साधत दुसऱ्या गेमसह अजिंक्यपद पटकावलं.

First published: November 8, 2017, 11:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading