• बेळगावमध्ये मराठी उमेदवारांचा जल्लोष

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 11, 2013 11:41 AM IST | Updated On: Mar 11, 2013 11:41 AM IST

    11 मार्चबेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा फडकला आहे. सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीने 33 जागा स्पष्ट बहुमत मिळवलंय. तर 19 कन्नड उमेदवार निवडून आले आहेत. तर 6 उर्दू भाषिक उमेदवार निवडून आले आहे. पण माजी उपमहापौर रेणू किल्लेदार आणि माजी महापौर मंदा बाळेकुंद्री यांना मात्र पराभवाचा धक्का बसलाय. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचीच पालिकेवर सत्ता होती. पण, कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. एकाही पक्षाने पक्षचिन्हावर ही निवडणूक लढवली नाही. यामुळे ही निवडणूक मराठी विरुध्द कन्नड भाषिक अशीच होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading