News18 Lokmat
  • सुपारी घेऊन राज ठाकरे करतायत आरोप -खडसे

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Mar 11, 2013 11:59 AM IST | Updated On: Mar 11, 2013 11:59 AM IST

    11 मार्चमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसेंवर सेटलमेंटचा आरोप केला होता. यावर एकनाथ खडसे यांनी सणसणीत प्रतिउत्तर दिलं आहे. जर आम्ही सेटलमेंट करत आहोत तर मनसे आमदारांनी विधानसभेत त्याबद्दल पुरावे द्यावे. विनाकारण चुकीचे आरोप करून बदनामी करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. कोणाची तरी सुपारी घेतल्या सारखं बोलणं हे या ठिकाणी योग्य नाही. मी शेतकरी माणूस आहे, मी कधी एसआरएमध्ये पडलो नाही, ना कोणत्या मीलच्या जागा बळकावल्या नाही असं असतं तर कोहिनूर मिलची जागा माझ्या नावावर झाली असती असा टोला खडसेंनी राज ठाकरेंना लगावला. तसंच मनसेमध्ये पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही, दोन पेग मारल्याशिवाय इंजिन स्टार्ट होत नाही हे शब्द यांच्याच पक्षातील बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आहे असं सांगत खडसेंनी चिमटा काढला. तसंच विरोध पक्षांवर आरोप करून सत्ताधार्‍यांना एकाप्रकारे मनसे मदत करत आहे असा आरोपही खडसे यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी