S M L
  • मनसेसैनिकांचा मुंबईत राडा

    Published On: Feb 27, 2013 03:49 PM IST | Updated On: Feb 27, 2013 03:49 PM IST

    27 फेब्रुवारीअहमदनगरमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीचे मोठे पडसाद राज्यभर उमटले. पण मनसे शक्तिशाली असलेल्या मुंबई आणि त्याखालोखाल पुण्यात त्याचे सगळ्यांत जास्त पडसाद उमटणं स्वाभाविक होतं. ठाणेअहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर दगडफेक होताच.. सगळ्यांत पहिली प्रतिक्रिया उमटली ती ठाण्यात. रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगड फेकण्यात आले. असा भ्याड हल्ला करण्यापेक्षा आम्हाला सामोरा या, असं आव्हान राष्ट्रावादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय.खार मुंबईतल्या खार इथं मनसे आमदार राम कदम यांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन आमदार राम कदम आणि मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक केली. सीएसटीया वादाचे पडसाद मुंबईतही तीव्र स्वरुपात उमटले आहेत. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचं कार्यालय फोडण्यात आलं. यानंतर महापालिकेबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.चेंबूरचेंबूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यानं ट्रॅफिक जाम झालं होतं. मात्र हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनही इथं कोणतंही पोलीस बंदोबस्त नव्हता. तसंच सिंधी कॅम्प परीसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मुंबईभर राडे- गिरगाव - राष्ट्रवादी कार्यलयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली - वडाळा - राष्ट्रवादीच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड केली- शिवाजी पार्क - राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रॉनी फर्नांडीस यांच्या कार्यालयाची तोडफोड - सायन - राष्ट्रवादी कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली कल्याणराज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेकीची प्रतिक्रिया कल्याणमध्ये उमटलीय. इथं अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यासाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर उल्हासनगरमधल्या लाल चक्की चौकात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजीत पवार यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं. अंबरनाथअंबरनाथमध्ये मनसेनं बंद पुकारलाय, त्यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं. पुणेपुण्यात राष्ट्रवादीनं मनसेच्या कार्यालयावर मोर्चा काढला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतच्या कार्यालयाजवळ त्यांचा फ्लेक्स जाळल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. काही वेळासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे बंद पाडला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close