• IBN लोकमत इम्पॅक्ट : गरवारे 'बाल'भवनच !

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Feb 20, 2013 04:09 PM IST | Updated On: Feb 20, 2013 04:09 PM IST

    20 फेब्रुवारीपुण्यातील गरवारे बालभवनच्या मैदानावर आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालन होणार नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेना पालिका गटनेत्यांच्या प्रस्तावाला मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी विरोध केला. आता हे कलादालन बालभवनच्या मागे असलेल्या पालिकेच्या डांबरकोठीच्या जागेवरती बांधण्याचा सुधारित प्रस्ताव शिवसेनेने मांडला आहे. त्यामुळे गरवारेचं बालभवनचं मैदान आता खेळासाठीच राखीव राहणार आहे.पुणे महापालिकेने 1979 साली आंतरराष्ट्रीय बालक वर्षाच्या निमित्ताने 2 एकर जागा मुलांच्या विकासासाठी राखून ठेवायचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अख्ख्या महाराष्ट्रातील सर्वच संस्थांनी याचं अनुकरण करत बालभवनांची उभारणी केली. फक्त पुण्यात 200 च्या आसपास बालभवनं सुरू झाली. बालभवन ही केवळ संस्था न उरता चळवळ बनली. पुणे महापालिका आणि गरवारे ट्रस्टचा हा संयुक्त प्रकल्प आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचं उत्तम उदाहरण असलेलं गरवारे बालभवन मुलांच्या आनंदाचं ठिकाण आहे. आता याच मैदानाावर व्यंगचित्रदालन उभारण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक अशोक हणावळ यांनी मांडला.गरवारे बालभवनवरचं हे काही पहीलं संकट नाही. याआधी शाहू स्मारक-पर्वती ते सारसबाग रोप वे करता स्टेशन असे प्रस्ताव मांडले गेले पण पालकांच्या -जागरूक पुणेकरांच्या एकजुटीमुळे ते मागे पडले. पण आता पुन्हा हजारो मुलांच्या हक्काच्या खेळण्याच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समृती जपण्यकरता उभ्या राहणार्‍या व्यंगचित्रकला दालनामुळे बालभवन नवं संकट सापडलं होतं. गेली 27 वर्ष मुलांसाठी उत्तम काम करत असलेल्या बालभवनाच्या 20 गुंठे जागेवर शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचं दालन उभं करण्याचा महापालिकेतील सेना गटनेत्यांनी तयारी केली होती. मात्र त्याला बालभवन ट्रस्ट तसेच बालक आणि पालक यांचा तीव्र विरोध केला. 2009 रोजी बालभवनचा आणि महापालिकेचा करार संपला असून तो पुन्हा वाढवण्याचा बालभवनचा प्रस्ताव 2 वर्ष धूळखात पडला. तर ज्या 20 गुंठे जागेवर कलादालन प्रस्तावित आहे त्या मोकळ्या मैदानाच्या आता कमर्शियल डेव्हलपमेंट असा नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रकरणी आयबीएन लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केला. अखेर महापालिकेनं आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. बालभवन मुलांसाठीच असणार यावर आज शिक्कामोर्तब झालं. पालिकेच्या या निर्णयामुळे चिमुकल्यामुलांनी बालभवनात एकच जल्लोष केला.पालकांसह,व्यवस्थापकानीही यावर समाधान व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading