चौफुला बारीचा नाद आणि 70 लाखांच्या बँक दरोड्याचा बनाव ; दरोडेखोर बँक मॅनेजरचा पर्दाफाश

चौफुला बारीचा नाद आणि 70 लाखांच्या बँक दरोड्याचा बनाव ; दरोडेखोर बँक मॅनेजरचा पर्दाफाश

महाराष्ट्र बँकेच्या गाडीवर पडलेल्या दरोड्याचा तपास लावण्यात २४ तासात लावण्यात पंढरपूर पोलिसांना यश आले असून दरोड्याचा बनावं करणारा बँकेचा व्यवस्थापक अमोल भोसले याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या दरोड्यात मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीचा माजी युवक अध्यक्ष रामेश्वर मासाळ याचा देखील सहभाग असल्याचं आढळून आलं असून पोलिसांनी त्याला देखील अटक केलीय.

  • Share this:

सुनील उंबरे, प्रतिनिधी

पंढरपूर, 02 नोव्हेंबर : महाराष्ट्र बँकेच्या गाडीवर पडलेल्या दरोड्याचा तपास लावण्यात २४ तासात लावण्यात पंढरपूर पोलिसांना यश आले असून दरोड्याचा बनावं करणारा बँकेचा व्यवस्थापक अमोल भोसले याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या दरोड्यात मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादीचा माजी युवक अध्यक्ष रामेश्वर मासाळ याचा देखील सहभाग असल्याचं आढळून आलं असून पोलिसांनी त्याला देखील अटक केलीय.

बुधवारी दुपारी पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावाजवळ बँक ऑफ महाराष्ट्राच्या गाडीतून ७० लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटल्याची खबर सांगोला बँकेचे व्यवस्थापक अमोल भोसले यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी भरदिवसा पडलेल्या या दरोड्याची गांभीर्याने दखल घेत तातडीने शोध पथकं रवाना केली. पण अधिक तपासाअंती संशयाची सुई ही फिर्यादी आणि बँकेचे व्यवस्थापक भोसले यांचेकडे जात असल्याने आढळून आले. पोलिसांनी या अमोल भोसले नावाच्या बँक मॅनेजरला आपला खाक्या दाखवताच भोसलेंनी आपणच दरोड्याचा बनाव रचल्याचं कबुल केलं.

भोसलेंनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंगळवेढा तालुक्यातून भाऊसाहेब कोळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने दरोड्यातील ३१ लाखाची रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली.

या बँक दरोड्याच्या बनाव प्रकरणात पोलिसांनी भोसले आणि कोळेकर या दोघांना अटक केली आहे. दरोड्यातील उर्वरित ३९ लाखाची रक्कम आणि बोलेरो गाडी जप्त करण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी दिली. या पत्रकार परिषद प्रसंगी पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक हर्षल गालिंदे, विक्रम गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शरद कदम, बबन साळुंखे, पंढरीनाथ आर्किले आदी उपस्थित होते.

दरोड्यात राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्याचाही सहभाग !

या बँक दरोड्यात मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी गावचे सरपंच आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. बँकेचे व्यवस्थापक भोसले आणि त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरोड्यातील संशयित म्हणून पोलिसांनी या नेत्यालाही अटक केलीय. या नेत्याच्या अटकेची माहिती खरंतर पंढरपूर पोलिसांकडून देणं टाळलं गेलं होतं. पण पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांनी यासंबंधीची माहिती उघड करताच पंढरपूर पोलिसांना सरपंच रामेश्वर मासाळ यालाही अटक केल्याचं कबुल करावं लागलंय.

बँक मॅनेजरने कसा रचला दरोड्याचा बनाव ?

सांगोला महाराष्ट्र बँकेचा मॅनेजर अमोल भोसले याला चौफुला बारी आणि अय्याशीचा नाद आहे. त्यातूनच तो कर्जबाजारी झाला होता. म्हणून या आर्थिक विवंचनेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या मॅनेजर महाशयांनी चक्क स्वतःचीच बँक लुटण्याचा बनाव रचला त्यासाठी आपल्या मित्रांना रोकड घेऊन जात असलेल्या बोरेलो गाडीवर दरोडा टाकण्यास सांगितले. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे खर्डी गावाजवळ मॅनेजरच्या मित्रांनी त्याची गाडी अडवली आणि पाठिमागच्या सीटवर बसलेल्या शिपायाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्यात आली. एवढंच नाहीतर संशय येऊ नये, म्हणून थोडीफार झटापटही घडवण्यात आली पण शिपाई आणि बँक मॅनेजरच्या जबाबादरम्यान भिन्नता आढळून आल्याने हा सगळा बनाव अखेर उघडकीस आला. दरोडा पडल्यानंतर खरंतर या बँक मॅनेजरने पोलीस नियंत्रण कक्षाच्या 100 नंबरला कळवणं अपेक्षित होतं. पण त्याने तसं करता आपल्या मॅनेजरला फोन केला आणि तिथंच पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाची चक्र उलटी फिरू लागताच दरोड्याचा बनाव उघडकीस आला.

First published: November 2, 2017, 9:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading